नमस्कार

मी डॉ. प्रशांत जाधव छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. मी इंग्रजी विषयामध्ये विद्यावाचस्तपती पदवी प्राप्त केली असून गेली दहा वर्षे अध्यापनाचे कार्य करत आहे. मी इंग्रजी विषयामध्ये भारतीय समाज, संस्कृती या विषयी विविध लेख प्रकाशित केले असून जवळपास ५० पेक्षा जास्त राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळा, परिषद यामध्ये सहभाग नोंदवला आहे.

मी महाविद्यालयामध्ये इंगजी भाषा संभाषण कौशल्य, मानव संसाधन विकास, मानव अधिकार, व्यक्तिमत्व विकास इत्यादी विषयाचे ज्ञानदान करण्याचे कार्य करतो. ज्ञानदानाबरोबरच ज्ञानार्जनाचे कार्यही सातत्याने सुरु आहे, नुकतेच मी व्यवसाय सल्लागार (करिअर कॉऊन्सेलर) प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.

मराठी भाषिक म्हणून या भाषेच्या उन्नतीसाठी व भाषा वृद्धिंगत व्हावी यासाठी कार्य करण्याची संधी या माध्यमातून भेटत आहे याचा मनस्वी आनंद आहे.


धन्यवाद...