रत्नाबाला देवी एन

संपादन

नोंगमायथम रत्नबाला देवी ही एक भारतीय महिला फुटबॉल खेळाडू आहे, जी मणिपूर राज्य आणि भारतीय राष्ट्रीय महिला संघाकडून खेळते. त्याशिवाय ती इंडियन वुमन लीगमध्ये (आयडब्ल्यूएल) KRYPHSA एफसीकडूनही खेळते.

वैयक्तिक आयुष्य आणि पार्श्वभूमी

संपादन

नोंगमायथम रत्नबाला देवीचा जन्म १२ फेब्रुवारी १९९९ रोजी भारताच्या मणिपूरमधील बिष्णुपूर जिल्ह्यातील नंबोल खाथोंग गावात झाला.

तिने मौजेखातर शेजारच्या मुलांबरोबर फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली. हळूहळू तिचा फुटबॉलमधील रस वाढू लागला. तिचे वडील एका खासगी कंपनीत चालकाची नोकरी करत होते, मात्र त्यांनी आर्थिक अडचण असतानाही त्यांच्या मुलीला फुटबॉल खेळण्यास प्रोत्साहित केले. [1]

एके दिवशी भारतीय महिला फुटबॉल संघात खेळायचं आहे, हे स्वप्न घेऊन देवीने इम्फालमधील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (एसएआय) प्रशिक्षण शिबिरात प्रवेश घेतला. एसएआयच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक आणि पुरेशा सोयीसुविधा होत्या, पण त्यांच्याकडे स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी टीम नव्हती. म्हणूनच, सामन्यांमध्ये खेळण्याचा सराव व्हावा, म्हणून देवीने स्थानिक KRYPHSA फुटबॉल क्लबमध्ये प्रवेश घेतला. तिथे प्रशिक्षणाच्या सोयीसुविधा तर होत्याच, पण त्याशिवाय तिला ओजा चाओबा नावाचे एक सक्षम प्रशिक्षकही भेटले. क्लबमधील प्रशिक्षणामुळे देवीला तिचे फुटबॉलचे कौशल्य आणि तंत्र सुधारण्याची संधी मिळाली.

लवकरच तिने विविध देशांतर्गत स्पर्धांमध्ये आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करण्यास सुरवात केली. तिच्या यशाचे सर्व श्रेय ती तिचे KRYPHSA फुटबॉल क्लबमधील प्रशिक्षक आणि तिच्या वडिलांनी दिलेल्या पाठबळाला देते. [1]

व्यावसायिक कारकीर्द

संपादन

देवीच्या आक्रमक शैलीने तिच्या संघांसाठी फायद्याचे ठरत गेले. तिने अनेक देशांतर्गत स्पर्धांमध्ये मणिपूर संघाला विजय मिळवून दिला आहे. [1]

२०१५ मध्ये तिची भारतीय महिला कनिष्ठ संघात निवड झाली. मात्र तिला भारतीय वरिष्ठ महिला संघाकडून खेळण्याची उत्सुकता होती. आणि तोही क्षण लवकरच आला. अगदी दोनच वर्षात, म्हणजेच २०१७ साली तिची  भारतीय वरिष्ठ महिला संघासाठी निवड झाली. [2]

तेव्हापासून देवी भारतीय संघातील एक महत्त्वाची सदस्य आहे. तिला फॉरवर्ड म्हणून खेळायला आवडत असले तरी, भारतीय संघात तिची भूमिका मिडफील्ड म्हणून खेळण्याची तसंच बचावात्मक स्थितीत काम करण्याची आहे. ती सांगते की प्रशिक्षक ज्या जागेवर तिला खेळायला सांगतील तिथे ती मोकळेपणाने खेळायला सज्ज असते. [2]

२०२०मध्ये तिच्या नेतृत्वात KRYPHSA एफसी हा संघ आयडब्ल्यूएलच्या चौथ्या आवृत्तीच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. [4]

२०१९ मध्ये नेपाळमध्ये झालेल्या पाचव्या एसएएफएफ चॅम्पियनशिपमध्ये देवी भारतीय महिला संघाचा भाग होती. त्याचबरोबर २०१९ मध्ये झालेल्या १३व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार्‍या भारतीय संघातही ती होती. तसेच एएफसी महिला ऑलिम्पिक पात्रता स्पर्धाही ती खेळली आहे. तिने हाँगकाँग आणि इंडोनेशियाविरुद्ध मैत्रीपूर्ण सामने खेळले आहेत. महत्त्वाचं म्हणजे इंडोनेशियाविरुद्धच्या सामन्यात तिने प्रथम आंतरराष्ट्रीय हॅटट्रिक केली. [5][6] स्पेनमधील २०१९च्या कोटिफ चषकात देवीने केलेल्या दोन गोलच्या जोरावर भारताने बोलिव्हियावर विजय मिळविला होता. [7]

तिच्या विशेष क्षमता लक्षात घेऊन एआयएफएफने तिचे वर्णन "the lungs of the Indian Women’s Team midfield" (भारतीय महिला संघाच्या मिडफील्डची फुप्फुसं) असे केले आहे. [3]

नोंगमायथम रत्नबाला देवी
वैयक्तिक माहिती
Citizenship भारतीय
जन्म १२ फेब्रुवारी १९९९
नंबोल खथोंग, जिल्हा बिष्णुपूर, मणिपूर
Sport
खेळ फूटबॉल