कारंजा लाड येधील स्वा.से.श्री.क.रा.इन्नाणी महाविद्यालयातील ग्रंथालयात विविध विषयातील संदर्भ ग्रंथ,क्रमिक पुस्तके,अवांतर पुस्तके व स्पर्धा परीक्षा संबंधित पुस्तके, ब्रेल पुस्तके,पी. एचडी. थेसीस, वार्षिक अहवाल, विविध विषयातील जर्नलस, मासिके, सी.डी,विविध विषयातील बांधणी अंक, वर्तमान पत्रे इत्यादी वाचनसाहित्य उपलब्ध आहे. वाचन कक्ष, दृक-श्राव्य विभाग, आंतरदेवघेव सेवा, पुस्तक पेढी, ओपॅक, मोबाईल ओपॅक इत्यादी ग्रंथालय सेवा व सुविधा विधार्थी व प्राध्यापकाकरिता उपलब्ध आहे.वाचकांकरिता विविध विषयातील लेख तसेच रोजगार संबंधित माहिती फलकावर नियमित प्रदर्शित करण्यात येते.ग्रंथालयाच्या सुरक्षाकरिता सी.सी.टीव्ही कॅमेरा लावण्यात आला आहे.