बॉक्स ऑफ सायन्स 

संपादन

विज्ञान हा तसा प्राचीन विषय. तितकाच आधुनिकही . अब्जावधी वर्षांपासून अस्तित्वास असणाऱ्या सृष्टीचा वेध घेण्याचे मानवाचे प्रयत्न आणि त्यातून नव्याने निर्माण होणारी जिज्ञासा असा हा पाठशिवणीचा खेळ 

सुरु आहे. आणि तो नित्याने चालत राहावा . कारण त्यातूनच ब्रह्मांडाची गूढ कथा समजू लागेल. या विषयाचा अभ्यास कसा करावा याचे एक ठराविक गणित आहे. निरीक्षणातून निष्कर्षापर्यंतचा हा प्रवास अत्यंत रोमांचक असतो. विज्ञानाचा अभ्यास करताना अगदी आदिमानवानेही नोंदी करून ठेवल्यायत. अलीकडच्या काळात जश्या सर्व गोष्टी डिजिटल होतायत तसं शिक्षणाची पद्धतही कात टाकतेय. 

शाळेचे वर्गही डिजिटल झालेयत. दृक श्राव्य माध्यमातून विज्ञानाच्या संकल्पना समजण्यास सोप्या होतात. आणि मोबाईल द्वारे तर सगळा विषयच तळहातावर विसावलाय. परंतु या माहितीच्या जाळ्यात ज्ञान कुठेतरी हरवल्यासारखे वाटते. ९०-९५% गुणांनी पास होणे सुगम झाले पण मुलांमधील कौशल्य तितकेसे विकसित होताना दिसत नाहीय. शाळेचा/महाविद्यालयाचा  अभ्यासक्रम हा फक्त परीक्षा आणि नंतर 

 
रसायनशास्त्र कार्यशाळा

नोकरी मिळवण्याकरिता नाहीय. त्यातून उत्कृष्ट कलागुणांनी सज्ज अशी पिढी तयार व्हावयास हवी. हे होण्यासाठी लहान वयातच कृतियुक्त शिक्षण देणे अपरिहार्य आहे. 'बॉक्स ऑफ सायन्स' च्या माध्यमातून आम्ही हि शैक्षणिक चळवळ उभी करतोय. विज्ञानाचे शिक्षण फक्त पुस्तकी  नसावे, त्यातील संकल्पना स्वतः प्रयोग करून विद्यार्थ्यांनी समजून घ्याव्यात. त्यासाठी आम्ही विविध प्रकारच्या कार्यशाळा आणि विज्ञान पेट्यांची निर्मिती केली आहे. आजपर्यंत सुमारे ५०,०००[] विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहचलो आहोत आणि हि दौड सुरूच आहे. 

प्रारंभ 

संपादन

या कार्याची सुरुवात अहमदनगर पासून झाली. पराग गोरे यांनी २००३ सालापासून विज्ञान प्रसारासाठी स्वतःला झोकून दिले. त्यांचे वय तेव्हा अवघे १४ वर्षे होते. या बालवयातच त्यांच्या टीम ने आकाशदर्शन, वैज्ञानिक चर्चासत्रे , शाळांमध्ये विज्ञान कार्यशाळा, शास्त्रज्ञ भेटी असे उपक्रम राबविणे सुरु केले. 

हळूहळू काम वाढत गेले. भौतिक शास्त्रातील पदवी घेऊन त्यांनी उपकरणशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. तदनंतर एक वर्ष नोकरी केली. लगेच धाडसी निर्णय घेऊन रोबोटिका या संस्थेची स्थापना केली. त्याद्वारे तंत्रशिक्षण शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे त्यांचे स्वप्न होते. तीन वर्षे रोबोटिक्स मध्ये कार्य करताना विज्ञानातही हे कार्य व्हावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणून पुढे 'बॉक्स ऑफ सायन्स[]' च्या रूपाने ती साकार झाली. आता हे रोपटे वाढू लागलेय.

कार्य 

संपादन
 
बॉक्स ऑफ सायन्स - सौर ऊर्जा कार्यशाळा 

'बॉक्स ऑफ सायन्स' ची मध्यवर्ती संकल्पना ही खालील मुद्द्यांवर केंद्रित आहे:

१. कृतियुक्त शिक्षण 

२. कमी खर्चात शिक्षण साहित्य निर्मिती 

३. प्रभावी शिक्षण पद्धतीचा विकास 

वरील उद्दिष्टपूर्तीसाठी विविध स्तरावर काम सुरु आहे. मुख्य दोन विभागांवर लक्ष देण्यात येते . 

अ. विज्ञान प्रयोग पेट्यांची  निर्मिती, स्वस्तात विक्री 

ब. कार्यशाळा, विज्ञान सत्रांचे, शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन 

आम्ही जवळपास ७५ हुन अधिक प्रकारच्या विज्ञान पेट्यांची निर्मिती केली आहे. या बॉक्सेस मध्ये 

रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र , खगोलशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल, रोबोटिक्स , इलेक्ट्रॉनिक्स अशा विषयांमधील अनेक 

प्रयोग समाविष्ट आहेत. या किट्स सोबत मार्गदर्शक नोट्स दिल्या जातात.

 
पराग गोरे  

कार्यशाळा 

संपादन

'बॉक्स ऑफ सायन्स'  तर्फे विविध कार्यशाळा[] आयोजित केल्या जातात. पुणे, अहमदनगर, नासिक, औरंगाबाद आदी ठिकाणी तसेच गुजरात , कर्नाटक, दिल्ली, ओडिशा अशा राज्यांमध्येही हे उपक्रम राबविण्यात येतात. त्यासाठी स्थानिक संयोजक पुढाकार घेतात. अशा कार्यशाळेत मुलांना विज्ञान पेट्यांचे वाटप करून त्यांच्याकडून विविध प्रकल्प बनवून घेतले जातात. 

  1. ^ http://www.buzzingg.com/industry/education-and-training/parag-gore-box-science-activity-based-learning-education/
  2. ^ https://startupsuccessstories.in/pune-based-edtech-startup-transforming-education-next-level-experiential-approach/
  3. ^ http://www.sakaltimes.com/pune/science-submarines-explained-4452