स्वतंत्र विदर्भ राज्य ही काळाची गरज आहे. हि मागणी शंभर वर्षाहुन अधिक जुनी असुन सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक पक्ष आणि संघटना स्वतंत्र राज्यासाठी संघर्ष करीत असुन सुद्धा या मागणीला हवी ती जोर मिळत नाही आहे. सर्व प्रथम याचं कारण शोधणे गरजेचे आहे. क्षारखंड आणि तेलंगनाच्या मागणीकरीता एक किंवा दोनच पक्ष संघर्ष करीत होते, पण विदर्भाच्या मागणीकरीता दहाहुन अधिक पक्ष आणि संघटना प्रयत्नशिल असुन सुद्धा अपयशी ठरत आहे. आज विदर्भासाठी झटणार्या सर्व पक्ष आणि संघटनांना एकत्र येण्याची गरज आहे, तेव्हाच कुठे या मागणीला पाहिजे ती जोर मिळू शकेल. विदर्भ प्रदेश मागासलेला आहे आणि तो वेगळा झाल्याशिवाय विकास शक्य नाही. आज विदर्भात विस्ताराने आणि क्षेत्रफळाने मोठमोठे ११ जिल्हे आहेत ज्यांचे सुद्धा विभाजन होउन जलद विकासाकरिता नविन जिल्ह्यांची निर्मिति होणे सुद्धा गरजेचे आहे. विदर्भ राज्याच्या मागणिला अधिक जोर मिळण्याकरिता विदर्भातील साहित्यिक, पत्रकार, कलावंत आणि युवक वर्ग मोलाची भुमिका बजावू शकतात्, तेव्हा अशा लोकांना एका व्यासपीठावर आणण्याच्या प्रयत्नांवर भर दिला गेला पाहिजे. निवडणुका जवळ आल्या आहेत, तेव्हा फक्त कट्टर विदर्भवाद्यांनाच तिकिटे मिळतील आणि तेच निवडुन येतील, यांवर भर दिला गेला पाहिजे. सोशल मिडियाचा देखील पुरेपुर वापर आपल्या विदर्भाच्या चळवळीत झाला पाहिजे. शालेय विद्यार्थांना विदर्भाच्या इतिहासाची जानकारी देणे काळाची गरज आहे कारण हेच विद्यार्थी भविष्यात विदर्भाचे नागरिक होणार आहेत. विदर्भ मुद्द्याचा वापर स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी करणार्याना धडा शिकवला गेला पाहिजे. आशा करतो कि येणार्या काही वर्षात नागपुर राजधानी सह विदर्भ वेगळा होईल.