ऑगमेन्टेड रिऍलिटी चा शिक्षणात वापर

ऑगमेन्टेड रिऍलिटी चा शिक्षणात वापर करताना आपल्याला हे तंत्रज्ञान काम कसे करते हे पाहणे आवश्यक ठरते. ऑगमेन्ट करणे याचा अर्थ एका प्रतिमेतून दुसरी प्रतिमा किंवा चलचित्र वा चौमितीय प्रतिमा अथवा लिंक बाहेर येणे. यात अँप द्वारे आपल्याला असे दृश्य विकसित करता येते. ज्या प्रतिमेवर आपण दुसरी प्रतिमा ऑगमेन्ट करतो तिला ट्रिगर इमेज असे म्हणतात.तर जी प्रतिमा ऑगमेन्ट होते तिला ओव्हर लेइंग इमेज म्हणतात.