पिर्ला केपे गावातील महाशिवरात्रि
    
 गोव्यात किंवा गोव्याबाहेर विविध ठिकाणी महाशिवरात्रिचा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. गोव्यात दक्षिण भारतामध्ये केपे पिर्ला नावाच्या गावामध्ये महाशिवरात्रिचा उत्सव दोन दिवस साजरा केला जातो. या गावाचा महादेव कुलदैवत म्हणून दोन दिवस त्यांची श्रध्देने पुजा केली जाते. पहिल्या दिवशी मंदिरात प्रत्येक घरातील पुरुष मंडळी महादेवाला दुधाचा व बेलाच्या पानांचा अभिषेक अर्पण करते. महादेवाला बेलाची पाने खूप आवडतात अशी समजूत कित्येक वर्षापूर्वी पासून शिव भक्तांच्या मनामध्ये आहे. 
    महाशिवरात्रिच्या दिवशी पिर्ला गावातील स्रिंया श्रध्देने उपहास करतात. हा उपहास दिवजांचा असतो. ज्या प्रमाणे पार्वती महादेवाचे रक्षण करते त्याच प्रमाणे स्रिंया आपल्या नवऱ्याच्या आयुष्याची रक्षण करण्यासाठी हे व्रत करतात. दुसऱ्या दिवशी सर्व स्रियां दिवज लावून मटाला व देवळाला श्रध्देने फेऱ्या घालतात. त्या दिवशी त्या गावात जत्रा मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते. हजारो लोक जत्रे साठी आलेले असतात. विविध दुकानांच्या फेऱ्या भरलेल्या असतात. दोन्ही दिवशी रात्री नाटके आयोजित केली जातात, रात्री विविध गावातून लोक या जत्रेसाठी जमतात.
    पहिल्या दिवसापासून दुसऱ्या दिवशी दिवज लावण्यापर्यंत प्रत्येक घरात शाकाहाराची शुध्दता कडकपणे बाळीगली जाते. 
    दक्षिण गोव्यातील हा धार्मिक सण दुसऱ्या महत्त्वाच्या सणापैकी एक सण आहे. दिवज लावण्याच्या वेळी कधी कधी शिव स्वतः भाराच्या रुपात येतात अशी श्रध्दा लोकांच्या मनात आहे. महादेवासाठी शिवरात्रिच्या दिवशी उपहास ठेवल्याने देवाचा आशिर्वाद सदैव आपल्यावर राहतो अशी जाण ठेवणारे कितीतरी लोक शिव देवासाठी व्रत ठेवतात. 

येथील पुर्वजांच्या अनुसार असे मानले जाते की या दिवशी महादेवाने विष प्याले होते. तसेच काही लोक मानतात की या दिवशी शिव, पार्वतीचे लग्न झाले होते. या दिवशी देवळामध्ये नंदीला सुध्दा पुजले जाते. या गावातील वर्षानुवर्षे पासुन चालत आलेली ही संस्कृती आहे. गाव वासीयांच्या मनात या दोन दिवसांच्या महाशिवरात्रि विषयी अनन्यसाधारण असे महत्त्व व श्रध्दा आहे.