महादेव जानकर यांनी २००३ साली राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला. जानकर हे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून हा पक्ष प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, आसाम, बिहार, कर्नाटक, उत्तरप्रदेश, गोवा अशा राज्यात अनेक निवडणुका लढवतो. २००४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत रासपाचे ३८ उमेदवार रिंगणात होते. त्यांना एकूण १४४,७५३ मते मिळाली जी एकूण मतांच्या ०.३५% होती. २००४ साली लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक मधून १२ उमेदवार उभे केले. रासपाला एकूण १४६,५७१ (०.०४%) मते मिळाली. २००९ साली लोकसभा निवडणुकीत पक्षाने महाराष्ट्रात २९, आसाममध्ये २, गुजरात आणि कर्नाटकात प्रत्येकी १ याप्रमाणे उमेदवार उभे केले. त्यांना महाराष्ट्रात एकूण १९०,७४३ आणि देशभरातून २०१,०६५ मते मिळाली. पक्षाध्यक्ष [[महादेव जानकर स्वतः माढा लोकसभा मतदारसंघ मध्ये शरद पवार(राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) आणि सुभाष देशमुख (भारतीय जनता पार्टी) यांच्या विरोधात उभे राहिले होते. त्यांना एकूण मतांच्या १०.७६ % मते प्राप्त झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जानकर हे बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे राहिले होते. जानकर यांना एकूण ४५१,८४३ मते प्राप्त झाली. सुळे यांना ४८.८८ % मते प्राप्त झाली तर जानकर यांना ४२.३५ % मते मिळाली.