शिवानी कटारिया

संपादन

शिवानी कटारिया (जन्म २ सप्टेंबर १९९७) ही एक हौशी भारतीय फ्री स्टाईल जलतरणपटू आहे, जिने २०१६च्या ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले होते. २००४ पासून ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी ती भारताची पहिली महिला जलतरणपटू होती. तसेच महिलांच्या २०० मीटर फ्री स्टाईल स्पर्धेत शिवानीचा राष्ट्रीय विक्रम आहे.

वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी

संपादन

शिवानीचा जन्म २ सप्टेंबर १९९७ रोजी हरियाणाच्या गुरुग्राममध्ये झाला. ती फक्त सहा वर्षांची असतानाच तिचे वडील तिला उन्हाळ्याच्या सुटीत जलतरण शिबिरात घेऊन गेले आणि लहान वयातच तिची पोहण्याची कारकीर्द सुरू झाली. तिच्या घराजवळच्या उन्हाळी शिबिरात आणि त्यानंतर जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत पदके मिळवल्यामुळे शिवानीचा या खेळातला उत्साह वाढला. प्रशिक्षणादरम्यान तिचा भाऊ साथीदार म्हणून भूमिका बजावत असे, आणि तिला विविध स्पर्धांच्या तयारीत मदत करत असे. [1]


स्थानिक स्पर्धांमध्ये मिळालेल्या यशामुळे तिला कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा मिळाली खरी, पण हरियाणामध्ये जलतरण या क्रीडाप्रकारासाठी पुरेशा सुविधा नसल्यामुळे तिला तीव्र अडचणी जाणवल्या. त्यापैकीच एक मोठे आव्हान म्हणजे आजूबाजूला गरम पाण्याची तळी नसणे, ज्यामुळे हिवाळ्यातील महिन्यांमध्ये प्रशिक्षणात खडं पडत असे. यामुळेच ती काही काळासाठी बेंगळुरू येथे स्थलांतरित झाली, जेथे तिला वर्षभर प्रशिक्षण घेता येत असे. [1]

व्यावसायिक कारकीर्द

संपादन

शिवानीने राष्ट्रीय पातळीवर ज्युनिअर स्तरावर अनेक विक्रम मोडले आणि नंतर

२०१३ मध्ये एशियन एज ग्रुप चॅम्पियनशिपमध्ये २०० मीटर फ्री स्टाईलमध्ये सहावे स्थान मिळविले. तसेच २०१४ च्या युवा ऑलिम्पिकमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. [1]

२०१५ मध्ये ती थायलंडमधील एका एफआयएनए कॅम्पमध्ये एका वर्षासाठी गेली आणि बी कार्ट टाइम स्लॉट पातळीच्या सर्वात जवळची वेळ २:०४:०० अशी तिने नोंदवले. याने शिवानीला हा विश्वास दिला की ती २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकेल, आणि २०१६च्या दक्षिण आशियाई स्पर्धेत या जलतरणपटूने सुवर्णपदक जिंकले. [4]

२०१६च्या ऑलिम्पिकमध्ये शिवानी ही भारताची वाईल्ड कार्ड एन्ट्री होती. २००४पासून कोणत्याही भारतीय महिला जलतरणपटूने उन्हाळी खेळात भाग घेतला नव्हता. तथापि, ती तिची पहिली ऑलिम्पिक असल्याने ती प्रबळ संभावनांमध्ये नव्हती. ‘उपांत्य फेरीपर्यंत पोहोचणे ऐतिहासिक ठरेल’, असे तिने या स्पर्धेआधीच सांगितले होते. पण ती फारशी चमक दाखवू शकली शकली नाही.

२०१७  मध्ये हरियाणा सरकारने शिवानी यांना राज्यातील क्रीडा उत्कृष्टतेचा सर्वोच्च पुरस्कार, भीम पुरस्काराने सन्मानित केले.

या युवा जलतरणपटूने २०१९च्या राष्ट्रीय जलक्रीडा चॅम्पियनशिपमध्ये आपला स्वतःचेच विक्रम मोडत २:०५:८० वेळेची नोंदवत सुवर्णपदक जिंकले.

भारतातील खेळामध्ये महिला प्रशिक्षक अधिक असतील तर महिलांना व्यावसायिकरीत्या पोहण्यास प्रोत्साहित करता येईल,’ असे शिवानी यांचे मत आहे.

शिवानी कटारिया
वैयक्तिक माहिती
Citizenship भारतीय
जन्म २७ सप्टेंबर १९९७
गुरुग्राम, हरियाणा
Sport
खेळ पोहणे