भगवान शंकरांच्या आरतीमध्ये उल्लेख असलेले हेमाडपंथी वेल्हाळा येथिल कपिलेश्मंवर मंदीर

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा येथिल अकराव्या शतकातील  कपिलेश्वर महादेव मंदीर आहे. यादव राजा यांनी या मंदीराची उभिरणी केली आहे. मोगलांच्या काळात मंदीर उभारता येत नसल्यामुळे तत्कालीन सहा महिन्यांच्या रात्री मध्ये मंदीराची उभारणी झाली आहे. रात्रभर संपत आल्यामुळे मंदीराचे काही काम अर्धवटच राहिले आहे. हे मंदीर हेमाडपंथी बांधकामांचे उत्क्रुष्ट उदाहरण आहे. मंदीरातील शिवलिंग श्री यंत्रावरील आहे. ते देशातील एकमेव लिंग असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. या मंदीरात भगवान शंकरांसोबत देवी उमा यांची प्रतिमा आहे. भगवान शंकराच्या आरतीमध्ये या जागृत महादेव मंदिराचा उल्लेख 'ऐसा भोला शंकर शोभे उमा वेल्हाळा''  असा उल्लेख करण्यात आल्याचे परिसरातील जुन्या जाणत्यांकडून सांगण्यात येते. याच ंदीरापासून तालुक्यातील वरणगाव येथिल नागेश्वर मंदीरात प्रांत एक भुयार आहे. मंदीरात एक सभामंडप आहे. मंदीराचा काही भाग जिर्ण होत आहे. मात्र पुरातत्व विभागाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.

आशिष पाटील

-९३२५४७७७७९