• गझल*

लपवून आठवांना...मी ठेवले उशाला त्यांचा महापसारा..का दाखवू जगाला...?

संदूक त्या व्यथांची...मी सावरीत होतो.. पण नेटकेपणा ना रुचला जरा सुखाला

भयमुक्त पाखरांची गिनती करू कशाला.... हल्ली गिधाड घारी...नाहीत औषधाला

रावण खुशाल व्हावे..मज वाटले तरीही असला विचार नाही पटला कधी मनाला

जितका मवाळ होतो..तितका जहाल झालो हेतू तरी न माझा...अद्याप पूर्ण झाला...

  • मुक्तासुत... योगेश चाळके*