मी सुजीत शरद शेडगे, वय वर्षे ४७ असून साताऱ्यात वास्तव्यास आहे. सन १९८३ पासून मी मल्लखांब हा मराठमोळा खेळ खेळत असून १९८५ पासून या खेळाचे प्रशिक्षण देत आहे. सध्या साताऱ्यातील अनंत इंग्लिश स्कूल येथे सायंकाळी ६ ते ९ या वेळेमध्ये मी मल्लखांब प्रशिक्षणाचे काम मी करीत आहे. मल्लखांब खेळातील माझे योगदानासाठी महाराष्ट्र शासनाने मला सन २००७-२००८ सालासाठी सर्वोत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकाचा शिव छत्रपती पुरस्कार देऊन गौरविले आहे.