महिलांना भेडसावणारे प्रश्न

मैं भी एक इंसान हुं

पत्थर दिल नही अपनो से जुडी  हुं...।१।

जिंदगी का हर पल अपनो के लिये लढी  हुं

जिंदगी में पीछे रही तो अपनो के लिये

आगे बढी तो सिर्फ अपनो के लिये

क्युकी मैं एक बेटी हुं...।२।

अपने जरूर हैं मुझसे रुठे मैं ना कभी अपनो से रुठी

हू अपनो के खुशी के लिये हर पल जुजती हुं

क्युकी मैं एक बेटी हुं...।३।

घर को जोडे रखती हुं

खुशी से घर को भरे रखती हुं

एक नहीं दो परिवार को सवर के रखती हुं

क्युकी मैं एक बेटी हुं...।४।

खीलता कमल हुं

गुंगुंनाती सुहानी धून हुं

रोशनी सा प्यार हुं

क्युकी मैं एक बेटी हुं...।५।

माना की मैं बेटा नहीं

एक पराया धन हू फिर भी क्यु मै

दो परिवार की शान हुं

क्युकी मैं एक बेटी हुं...।६।

मैं एक बेटी हुं

खुशीयो  से लीपटी हुं...।७।

स्त्री (महिला) म्हटले तर ती आई , बहीण, सून, मुलगी,या सगळ्या जिमेदार्‍या ह्या एकच महिला पूर्ण पाडत असते.त्याच बरोबर महिला म्हटले तर आता सर्व क्षेत्रात मोठ्याप्रमाणात आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली जात आहे.महिला या आपल्या देशाचा स्वाभिमान झाल्या असून त्या सर्व क्षेत्रात आपले नविन अस्तित्व निर्माण करत असून देशासाठी एक मिसाल बनून पुढील पिढ्यांसाठी एक आदर्श निर्माण करत आहे. महिला ही अनेक क्षेत्रात आपले योगदान देत आहे त्यात मग राजकारण , क्रीडा, संशोधन, कला, इत्यादी मध्ये मोठ्या साह्याने एक आदर्श निर्माण करत आहे.त्यात पाहिले तर सिंधू ताई सपकाळ,कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, किरण बेदी, सायना नेहवाल, सानिया मिर्झा, प्रतिभा ताई पाटील, आनंदिबाई  जोशी  इत्यादी महिलांनी आपले नविन अस्तित्व निर्माण करून एक आदर्श जगा समोर मांडला आहे.पण त्यांना या गोष्टींसाठी खूप संघर्ष करवा लागला.

महिला ही आता प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने चालत असून आपले नवीन अस्तित्व निर्माण करत आहे.आपल्या परिवारासोबत ती आपल्या समाजाचे आपल्या देशाचे नाव हे जगभरात रोशन करत आहे.प्रत्येक क्षेत्रात आपली बाजी मारत असून तिने नविन ओळख निर्माण करून आपले ,आपल्या परिवाराचे आणि आपल्या देशाची स्वाभिमान आणि अभिमान बनली असून तिचा हातभार हा आपल्या देशाच्या विकासासाठी लागला आहे.पण महिलान साठी हे सगळ खूप सोप आहे का ? तिला सगळ्यां गोष्टी या सहज शक्य आहे का ? याचे उत्तर आहे की नाही महिलांना हे सगळ खूप सोप नाही. आपण पाहतो की महिला ही आपल्या देशाचा अभिमान आहे पण या अभिमानाला अळा घातला आहे.आज आपण रोज पाहतो की आपल्या समाजात , अपल्या देशात महिला ही पूर्णपणे सुरक्षित नाही आहे.ती मुक्तपणे आपल्या देशात वावरू शकत नाही.पण का ? महिला ही का मुक्त पणे वावरू शकत नाही ? आता हे प्रश्न आपण स्वतःलच विचारा.महिलांना त्याच्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.महिलांना प्रत्येक वेळेस स्वतः ला सिद्ध करावे लागते.पण असे का? का महिला या आपल्या देशात सुरक्षित नाही आहे?

महिला या नेहमी का प्रत्येक वेळेस स्वतः ला सिद्ध करेल.आपण आपल्याच समाजात पाहिले तर अनेक महिलांनी आपले नविन अस्तित्व निर्माण केले आहेत पण त्यांना किती संघर्ष करावा लागला.त्यात आता सिंधू ताई सपकाळ याचे नाव ऐकले की एक वेगळाच आदर्श निर्माण होतो.अनाथांची माय झाल्या त्या त्याच्या जीवनाबद्दल तर सांगतीले तर दमडाजीने सिंधुताईंच्या पोटातील मूल आपले असल्याचा प्रचार सुरू केला. नवऱ्याच्या मनात त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या ताईंना त्याने बेदम मारून घराबाहेर काढले. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकले.पण तेव्हा सुद्धा त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागले फक्त ते आपल्या समाजात लोकाच्या डोक्यात असलेल्या कर्मठ विचारानमुळे.

तसच अजून पाहिले तर आनंदीबाई जोशी आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत गोपाळरावांनी अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती, आणि धर्मांतर करणे तर यांना मान्य नव्हते. मात्र त्यांनी प्रयत्‍न सोडले नाहीत. पुढे आनंदीबाईंची तळमळ आणि गोपाळरावांची चिकाटी यांचे फलित म्हणजे आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता १८८३मध्ये, वयाच्या एकोणिसाव्या वर्षी 'विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया'मध्ये प्रवेश मिळाला. तेथे गेल्यानंतर अमेरिकेतील नवीन वातावरण आणि प्रवासातील दगदग यामुळे आनंदीबाईंची प्रकृती खूप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील कारपेंटर जोडप्याचे साहाय्य त्यांना लाभले.

सुरुवातीला तत्कालीन भारतीय समाजाकडून आनंदीबाईंच्या डाॅक्टर होण्याला खूप विरोध झाला. त्यावेळी आनंदीबाईंनी कोलकाता येथे एक भाषण केले. तेव्हा त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले, आणि हे स्पष्ट सांगितले की, मला यासाठी धर्मांतर वगैरे करण्याची काही गरज नाही. मी माझा हिंदु धर्म व संस्कृती यांचा कदापि त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे. आता इथे सुधा त्यांना आपल्याच लोकांना समजावून आपले ध्येय निश्चित करावे लागले. अश्या अनेक महिलांना आपल्या ध्येपूर्तीसाठी संघर्ष हा करवा लागलं आणि आता पण करत आहेत.

आता पाहिले तर महिलांना स्वतःच्या ध्येयाकडे जाताना अनेक भेडसावणारे प्रश्न निर्माण होतेत.महिला ही सुरक्षित का नाही? तर कुठे महिलांचे लेंगिक शोषण का केले जाते? त्यावर अत्याचार का केला जातो ? कधी महिला या समाजात सुरक्षित होतील? याचे उत्तर भेटणे आवश्यक आहे.

आपण पाहिले तर आपल्या समाजात अजून सुधा महिलेचे काम हे चूल आणि मूल आहे अशी विचार धारा असणारे या समाजात अजून काही लोक आहेत.पण ते योग्य आहे का ? कधी आपण आपले विचार बदल करणार? आपल्या आई,बहीण,सून,मुलगी,याच्या चरित्रावर हे डाग लावले जात आहे ते कधी संपवणार. सरकार ने कायदे केले पाहिजे नाहीतर महिलांना सुरक्षिता दिली पाहिजे अस आपण म्हणतो पण त्यांनी कायदे करून काय फायदा ज्या कायद्याचे पालन करत नाही.जर आपणच आपले विचार बदले ,आपण महिलांचा समान केला,त्याचा स्वाभिमान बाळगला पाहिजे तेवढे केले तर आपल्याला कोणत्याच कायदेची गरज पडणार नाही.कोणत्याच महिलांवर अत्याचार होणार नाही. आणि त्याच बरोबर महिलांना होणारा त्रास म्हणजे प्रवास करताना, आपल्या ऑफिस मध्ये कामाच्या वेळेस,तर काही लोकांच्या विचारामुळे तर महिलांना असणाऱ्या मासिक पाळी मूळे पण हे बाब खूप सोप्या नसून यामुळे महिलांच्या विकाससाठी खूप प्रश्न निर्माण करत आहे.


महिलांना आपल्या ध्येयाकडे जाताना आणि मुक्तपणे संचार करताना काही गोष्टींना तोंड द्यावे लागते.त्यात मग अत्याचार असो या असुरक्षितपण इत्यादी चे निवारण करणे गरजेचे आहे.त्याचा ध्येयाला साथ देणे हे परिवाराचे,समाजाचे,आणि देशाचे काम आहे त्यामुळे फक्त तिचा विकास नसून आपल्या पूर्ण देशाचा विकास होईल.

स्त्रीचा सन्मान करा .तिचा आदर करा. स्त्री शक्तीचा आदर करा...तिला प्रधान्य ध्या.त्या स्त्री शक्तीला अशक्त समजू नका.जेव्हा जेव्हा तिच्या स्वभिमानावर तिच्या चारित्र्यावर अळा येईल तेव्हा ती आपली स्त्री शक्ती दाखवेल.

पत्नी होऊन संसारच्या गाड्याचा आधार होईल

आई होऊन ममतेचा झरा होईल

बहीण होऊन संरक्षणाचा धागा होईल

स्त्री असल्यामुळे आपल्या जिमेदारीचा पगडा स्वतः घेईल.