शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे शासन परिपत्रकानुसार श्री. वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा  दिनांक २७ फेब्रुवारी हा जन्मदिन " मराठी भाषा गौरव दिन " म्हणून साजरा करण्यात येतो दिनांक २७ फेब्रुवारी,२०१७ रोजी मराठी भाषा गौरव दिन मानून हा दिवस मोठया प्रमाणावर साजरा करण्यासाठी उपस्थित समुदाय व सर्व शहरवासियांना आवाहन करण्यात येते की, मराठी भाषेचा उगम, विकास, समृद्धी, भवितव्य तसेच सदर भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन करणेच्या अनुषंगाने लेख, निबंध, कथा, संग्रह, काव्य इ. साहित्य लिहून मराठी विकिपीडियावर उपलब्ध करण्यात यावेत.