विशाल जंगलाप्पा देवकर महाराष्ट्रामधील वाशिम मधील आहेत
जन्म ११ मार्च १९९२ रोजी वाशिम येथे जन्म
प्राथमिक शिक्षण श्री शिवाजी ज्ञानपीठ शाळेतून झाले त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण श्री शिवाजी हायस्कूल वाशिम मधून पूर्ण केले ११ व्या वर्गात राजस्थान महाविद्यालयात MCVC ला प्रवेश घेतला व तेथूनच वाणिज्य विषयात पदवी प्राप्त केली बालपणापासून समाजसेवेची आवड बालपणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात असल्यामुळे दररोज सायंकाळी शाळा सुटल्यावर शाखेत जाणे हा नित्यक्रम होता समाजसेवा करायची तीव्र इच्छा होती महाविद्यालयात शिकत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शी संपर्क झाला आणि तेथूनच एका वेगळ्या प्रवासाला सुरुवात झाली 2010 मध्ये अभाविप च्या संपर्कात आल्यानंतर सुरुवात वाशिम नगरात सहसंघटक जबाबदारी पासून केली पुढे जिल्हा संयोजक नंतर 2013 मध्ये स्वामी विवेकानंद सार्धशती वर्ष विस्तारक म्हणून गडचिरोली मध्ये काम केले त्यांनतर यवतमाळ जिल्हा संघटन मंत्री म्हणून सुद्धा काम केले 2019 ला घरी परत आगमन झाल्यावर व्यक्तिगत जीवनात पदार्पण केले सोबतच विद्यार्थी चळवळीतून आल्यामुळे एक ठिकाणी रहावत नव्हते म्हणून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात त्यात सहभागी होण्यात खुप आवड होती. आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या मंदिर निर्माण चे वाशिम जिल्हा कार्यालय प्रमुख म्हणून काम केले वर्तमानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वाशिम जिल्हा प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी आहे.