विशाल तायडे
संपादनविशाल तायडे(जन्म १९७५) हे जिल्हा शैक्षणिक सातत्यपुर्ण व्यावसायीक विकास संस्थेत ज्येष्ठ अधिव्याख्याता पदावर कार्यरत आहेत.त्यांनी शिक्षणशास्त्रात पीएच.डी. प्राप्त केलेली असून याच विषयात ते नेट परीक्षा उत्तीर्ण आहे.
ते मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत लेखन करतात.आतापर्यत त्यांनी बालसाहित्य,अनुवाद,विनोदी लेखन,संपादन असे साहित्य प्रकार हाताळलेले आहेत.
प्रकाशीत साहित्य :
--अनुवादीत: १)डिसग्रेस (कादंबरी) २)स्नो(कादंबरी) ३)कपीशजी(कादंबरी) ४)प्रेमचंद यांच्या श्रेष्ठ कथा(कथासंग्रह) ५)प्रेमचंद यांच्या श्रेष्ठ बालकथा(बालकथासंग्रह) ६)मँक्सिम गॉर्की यांच्या श्रेष्ठ कथा (कथासंग्रह) ७)आय अँम विद्या(आत्मकथन) ८)महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा पत्रसंग्रह:खंड ५,भाग ३.
--बालसाहित्य:
१)मैत्री(बालकादंबरी)
२)पतंग(बालकथासंग्रह)
३)प्राण्यांचा व्हॉटस् अँप आणि इतर गोष्टी(बालकथासंग्रह)
--संदर्भ पुस्तके/पुरक वाचन साहित्य निर्मिती: १)माझे पुस्तक:संक्रमण शिक्षण केंद्रातील(इ.१ली ते ४थी) मुलांसाठी सेतुसाहित्य-यशदा,पुणे. २)जीवन कौशल्ये शिक्षण(इ.१ली ते ८वी संपादन समिती सदस्य)-म.रा.शै.सं.व प्र.परि.,पुणे. ३)राज्यशास्त्र:संपुर्ण मार्गदर्शक(स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यासाठी)
--पुरस्कार/दखल: १) साहित्य अकादमी,नवी दिल्ली यांची नवलेखकांसाठी असलेली प्रवासवृत्ती प्राप्त. २)'डिसग्रेस'या पुस्तकाची केंद्र शासनाच्या भारतीय भाषा संस्थान,म्हैसूर यांच्याकडून भारतभर वितरणासाठी निवड.
इंग्रजीमध्ये 'द सिक्रेट अँटीक'(इंग्लड),न्यु एशीयन रायटींग अशा नियतकालीकांमधून लेखन प्रसिद्ध.
https://vishaltayade.blogspot.in/ डॉ. विशाल तायडे ब्लॉग