सदस्य:विजय लक्ष्मण थोरात/२०ऑगस्ट कार्यशाळा
रामभाऊ राजवाडे पारतत्र्याच्या काळात ब्रिटीश अधिकाऱ्यानी सोलापुरातील निरपराध जनतेबरोबर केलेल्या राक्षसी अत्याचाराला गोळीबाराला आपल्या कर्मयोगी साप्ताहिकातून तोंड फोडून त्याबद्दलचा सविस्तर वृत्तांत परिणामाची पर्वा न करता छापणारे रामचंद्र शंकर तथा रामभाऊ राजवाडे हे एक निभ्रीड संपादक थोर देशभक्त कुशल संघटक, नामवंत मल्ल, पट्टीचे वक्ते, निपुण तबलावादक, हिंदूचे पुढारी आणि समंजस मुस्लीम नेत्याशी सलोख्याने संबध असणारे नेते होते. त्याचा जन्म सातारा जिल्ह्यातील वडूज गावी १८९१ सालातील ७ एप्रिलला झाला. शाळेत एक हुशार शिस्तप्रिय कुस्तीप्रीय आणि सत्यप्रिय विध्यार्थी म्हणून त्याची ख्याती होती. सोलापूर येथील नॉर्थकोट हायस्कूलमधून म्याट्रिक झाल्यावर काही वर्षे रेव्हेन्यू खात्यात नोकरी करत सरत टे वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९१७ ते २० अशी ३ वर्षे वकिली करून एक नामवंत वकील म्हणून त्यानी नाव मिळविलं. ५ मे १९३० रोजी महात्मा गाधीना अटक केल्याची बातमी सोलापुरात समजताच कडकडीत हरताळ पाळला गेला. मिरवणुका काढल्या गेल्या व ब्रिटीश सरकारचा निषेध करण्यात आला. ८ मे १९३० रोजी शिदीची झाडे तोडण्यास काही तरुण गेले होते. तेथून दंगलीस सुरुवात झाली. पोलिसांनी नाहक आणि बेछूट गोळीबार केल्याने बरीच निरपराध माणसं प्राणास मुकली, त्यामुळे राजवाड्यांना संताप आला आणि त्यांनी दग्याची खरी हकीकत मिळवून कर्मयोगीतून प्रसिद्ध करण्याचं ठरविलं. प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र माणसं पाठवून आणि कर्मयोगीच्या कार्यालयासमोर माहिती मिळविण्यासाठी केंद्र उघडून सरकारी हिंसाचाराची सविस्तर माहिती मिळविली. ती सविस्तरपणे पुराव्यानिशी १९३० सालच्या १० मे च्या कर्मयोगीच्या आकांत छापली. या अंकाची किंमत एक पेसा होती आणि तो अक घेण्यासाठी प्रचंड जनसमुदाय जमा झालेला होता. एवढेच नव्हे तर केसरी पत्रातील हि माहिती प्रसिद्ध करण्यासाठी पाठविली. तसेच लंडनमधील प्रमुख वर्तमानपत्रातह ती छापून यावी म्हणून भाषांतर करून लंडनला पाठविली.त्या पत्रानीहि ते भाषांतर प्रसिद्ध केले.त्यामुळे साऱ्या जगभर ब्रिटीश सरकारची नाचक्की झाली. ब्रिटीश लष्करी अत्याचाराच्या खऱ्या बातम्या चापल्याचा परिणाम म्हणून कर्मयोगीचे अंक आणि कर्मयोगी छापताना जप्त करण्यात आला. १६ मे १९३० रोजी राजवाडेना सरकारने अटक करून त्याच्यावर खटला भरला. त्यात त्यांना ७ वर्षे सक्तमजुरीची आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा झाली. गाधी आयर्वित करारानुसार पुढे त्याची सुटका करण्यात आली. त्यांना अटक झाल्यावर त्याच्या घराला मंदिराच स्वरूप प्राप्त झाल होत. त्याचं घर म्हणजे मातृभूमीच्य सेवेचा आणि त्यागाचा राजवाडाच झालेला होता. कर्मयोगी तील लेख दर्जेदार भारदस्त राष्टीय विचारांना चालना देणारे अन्यायाला वाचा फोडणारे देशभक्तीची जागृती करणारे चटकदार आणि मार्मिक असत. सर्वच विषयाची माडणी मुद्देसूद असायची जिल्ह्यातील चळवळीचा कार्याचा चालू घडामोडीचा व नगरपालिकेतील राजकारणाचा त्यात परामर्श घेतलेला असायचा. त्याची लेखनशैली धारदार आणि निभ्रीड असल्यानं ती लोकप्रिय झालेली होती. साहित्य सम्राट तात्यासाहेब केळकर भालाकार भोपटकर याच्याशी त्याचे घनिष्ठ संबध होते. केसरी ची म्हणजे लोकमान्य टीलकाच परंपरा प्रभावीपणे सोलापुरात चालू ठेवण्याच कार्य राजवाडे आणि त्याच्या कर्मयोगी साप्ताहिकान मोठ्या निष्ठेने केल. अध्र्ग्वायुच्या आजारामुळ १८ एप्रिल १९४९ रोजी त्याचे निधन झाले. संदर्भ भारतीय स्वतंत्र लढ्यातील सोलापूरचे दीपस्तंभ प्रा.डॉ.
वर्ग (++): (+)