राया म्हणजे राजा किंवा स्वामी होय.उदा.स्वामीराया,शिवराया,इ.रायबा हे स्वराज्यातील महत्त्वाचे सरदार आणि शिवरायांचे विश्वासू साथीदार तान्हाजी मालुसरे यांच्या मुलाचे नाव होते.छत्रपती संभाजी महाराजांच्या विश्वासू साथीदाराचे नाव रायाप्पा उर्फ रायनाक होते.त्यासोबत अंता किंवा अंतनाक हा ही त्यांचा एक विश्वासू सेवक होता.रायाप्पा आणि अंता संभाजी राजांसोबत सावलीसारखे वावरले.पेशवाई काळात रायगडावर रायनाक टोक आहे.इंग्रज आणि पेशव्यांनी रायगडावर हल्ला केल्यानंतर सरदार यशवंतराव मोहिते यांच्यासोबत रायनाक महार लढल्याचे पुरावे सापडतात.इंग्रज आणि पेशव्यांच्या सैन्याने रायगड काबीज केल्यानंतर रायनाकाला एक टोकावरून कडेलोट केला..त्याच्या नावावरून रायनाक टोक हे नाव मिळाले.[रायगडाची आत्मकथा]