जाधवराव घराने

!!! जाधवराव घराणे व राजे भोसले घराणे  !!!

१) राजे लखुजीराव जाधवराव यांचा म्रुत्यु २५ जुलै १६२९ सालचा.त्यांच्यासोबत त्यांचे दोन पुत्र राजे अचलोजीराव व राजे राघोजीराव आणी नातु युवराज राजे यशवंतराव (राजे दत्ताजीराव पुत्र) व काही आप्तमंडळी मारले गेले. यांच्या म्रुत्युनंतर शहाजीमहाराजसाहेब यानी परंडा येथुन निजामशहाच्या विरोधात बंड करुन आपल्या जहागिरीत पुढील ७-८ महिने स्वतंत्रता जाहीर केली. यांच्या विरोधात निजामशहा व आदिलशहा यांचे संयुक्त सैन्यानी पुण्यावर आक्रमण करुन पुणे बेचिराख केले..यासमयी राजमाता जिजाऊ आऊसाहेब या गरोदर होत्या...यासमयी राजे लखुजीराव जीवंत नसताना यांचे नाव शहाजीमहाराजसाहेब व जिजाऊ आऊसाहेब विरोधात गोवण्याचे घाणेरडे प्रकार चालवले गेले ,ते देखील उत्तरकालीन (१८८ वर्षानंतर लिहिलेल्या बखरीवरुन) बखरीवरुन. त्याचे अनुकरण आजचे काही जातीवाचक लोक फेक आयडीवरुन करत आहेत..वास्तवात शहाजीराजे व जिजाऊ आऊसाहेब याना गरोदर असताना पाठलाग केला तो आदिलशहाकडुन मुरारजगदेव व निजामशाहाकडुन मुस्लिम सरदारानी...परंतु हेतुपुरस्सर नाव जोडले गेले जीवंत नसलेल्या राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचे पिता राजे लखुजीराव जाधवराव यांचे...व्वा चुकिचा इतिहास मांडावा तो यासारख्या लोकांकडून....

२)राजे लखुजीराव यांच्या म्रुत्युनंतर त्यांचे नातु ठाकुरजी /पतंगराव जाधवराव/ दख्खनी जाधवराव (राजे दत्ताजीराव पुत्र) व त्यांचे दोन पुतणे राजे रतनोजी/रुस्तुमराव ,राजे लखुजी दुसरे (दोन्ही राजे यशवंतराव पुत्र) यानी छत्रपती शिवराय महाराज यांच्याशी संधान बांधुन महाराजांच्या सुचनेनुसार कधी स्वराज्यात तर कधी मोगलांकडे राहुन मराठा स्वराज्याचेच महत्तम कार्य केले...यात लखुजी दुसरे /लखमोजी जाधवराव यांचि शाखा कायम स्वराज्यात राहुन शेवटपर्यंत स्वराज्यासाठी कार्य करुन गेली....विशेष कार्य थोरले छत्रपती शाहु महाराज यांच्या कार्यकाळात....

३) ठाकुरजी जाधवराव यांचे इ सन १६५९ सालच्या आफझलवधानंतरचा महत्वपुर्ण लढा , प्रत्यक्ष विजापुरच्या सिमेपर्यंत सरसेनापती नेताजीराव पालकर यांच्या नेतृत्वाखाली, इ सन १६६० मधील आदिलशहाविरोधातील कोल्हापूर युद्धातील खुद्द छत्रपती शिवराय महाराजांच्या डाव्या आघाडीवर केलेला महत्त्वाचा पराक्रम ,पुढे महाराज पन्हाळा गडावर आडकले आसताना बाहेरून नेताजीराव पालकर, ठाकुरजी जाधवराव, त्यांचे पुतणे व सिद्दी हिलाल यानी दिलेला लढा, पुढे इ सन १६७० साली महाराजांच्या सांगण्यावरून मोगलांकडे गेलेले ठाकुरजी जाधवराव, त्यांचे पुतणे रतनोजी/रुस्तुमराव, सिद्दी हिलाल याना नाशिक व वणीची ठाणेदारी दिली गेली...महाराजांनी इसन १६७२ साली साल्हेर-मुल्हेर मोहिम काढली व यात स्वराज्याच्या सैन्यास प्रतिकार केला नाही म्हणून मोगल सुभेदार बहादुरखान याच्यासोबत वाद घालुन ही मंडळी परत स्वराज्यात दाखल झाली ते देखील महाराजांच्या सुचनेनुसारच....याचे अस्सल संदर्भ उपलब्ध आहेत...पुढे इ सन १६७५ साली महाराजाना दक्षिण दिग्विजयासाठी जाण्यागोदर खुद्द महाराजांनी ठाकुरजी जाधवराव व त्यांचे पुतणे रतनोजी/रुस्तुमराव व सिद्दी हिलाल याना परत आपले दुत सरदार म्हणून मोगलांकडे राजपुत सरदारांमार्फत पाठवले...याचे समकालीन अस्सल संदर्भ उपलब्ध आहेत बरं का !!! ही थोरल्या शाखेतील जाधवरावांची कामगिरी माहिती नसताना काहीजण उचलली जीभ लावली टाळाला असा प्रकार करत फिरत आहेत...

४) राजे अचलोजीराव यांचे पुत्र संताजीराव/स्रुजनसिंह ,नातु शंभुसिंह पणतु सरसेनापती धनाजीराजे जाधवराव यांचे कार्य तर सार्या जगाला माहिती आहे.. ही शाखा कायम शेवटपर्यंत स्वराज्यात राहिली..सरसेनापती धनाजीराजे यानी पाच छत्रपतींच्या अधिकाराखाली या स्वराज्याचे प्रचंड योगदान देखील काहीजण विसरलेले दिसुन येतात हे इतिहासातील जातीद्वेषाचे दुर्दैव म्हणावे लागेल.....फक्त अपवाद चंद्रसेनराव जाधवराव यांचा..परंतु याना निजामाकडे जाण्यास ज्यानी भाग पाडले त्यांच्याकडे कायमचे दुर्लक्ष करायचे आणी टिका करत फिरायचा प्रकार चालवला...निजामाकडे बर्याच सरदाराना जाण्यास भाग पाडलेली व्यक्ती मात्र दोषी नाही हे आवघड आहे....बरे असो.

५) मोगलांकडे शेवटपर्यंत राहिलेल्या जाधवरावांमध्ये देऊळगावराजा शाखेतील राजे दत्ताजीराव यांची शाखा....या जाधवरावांकडे मोगलांकडे आसताना संपुर्ण बालाघाटाचा प्रांत होता....आणी छत्रपती शिवराय महाराज आपले प्रचंड सैन्य दक्षिण दिग्विजयासाठी घेऊन गेले ते याच बालाघाटाच्या प्रांतातून.... ते कसे जाऊ शकले याचा अभ्यास टिकाकारानी आवश्य करावा.... मोगलांकडे असुन देखील ती वाट याच जाधवरावानी दिलेली आहे...

६) मराठा स्वराज्यात प्रचंड पराक्रम गाजवणारे सुभेदार पिलाजीराव जाधवराव देखील याच जाधवराव घराण्यापैकी आहेत हे देखील काहीजण नजरेआड करताना दिसुन येतात..हे इतिहासाचे दुर्दैव होय.. सुभेदार पिलाजीराव हे छत्रपती शाहू यांचे खाजगी सल्लागार, मराठा साम्राज्याचे परराष्ट्रमंत्री व मराठा साम्राज्याचे तिसरे प्रधान थोरले बाजीराव यांचे गुरु होत.

७) थोरले छत्रपती शाहु महाराज इ सन १७०७ मध्ये कैदेतुन सुटुन आल्यानंतर ज्या मराठा सरदारानी त्याना मोलाची साथ दिली ते रुस्तुमराव जाधवराव हे होत...हे देखील काहीजण माहिती नसताना माहिती जाणुन न घेता टिका करताना दिसुन येतात हे देखील दुर्दैवच आहे असे म्हणावे लागेल. तसेच याच रुस्तुमराव जाधवराव यांचे बंधू लक्ष्मणरावराजे याना थोरले माधवराव प्रधान यांच्यासोबत कर्नाटक मोहिमेत वीरमरण प्राप्त झाले..

८) रायाजीराव जाधवराव व त्यांचे पाच बंधु यानी थोरले छत्रपती शाहू महाराज याना मोलाची साथ दिली हे देखील काहीजण परस्पर विसरलेले दिसुन येतात...

९) छत्रपती शाहु महाराज यांच्या म्रुत्युनंतर सातारा गादी साठी ज्या छत्रपतीनिष्ठ सरदारानी लढा दिला त्यात रावमानसिंह जाधवराव होते ते याच जाधवराव घराण्याचे असुन ते छत्रपती राजाराम महाराज यांचे भाच्चे होत.

१०) इंग्रजाविरोधात वीरमरण प्राप्त झालेले बाजीरावराजे जाधवराव हे देखील याच जाधवराव घराण्याचे होत.

११) देऊळगावराजा, आडगावराजा, किनगावराजा, जवळखेड, उमरद रुसुमचे , मेहुणाराजा,भुईंज,माळेगाव बुद्रुक,मांडवे,वडाळी, करवंड,करणखेड,माहेगाव देशमुख, कुंभारगाव,अक्कलकोट, वाघोली या समस्त जाधवराव शाखेतील जाधवराव घराण्याच्या शिवकाळ,शिव उत्तर काळातील योगदानावर प्रकाश टाकलेला आहे...