मी माया पवार सातारा जिल्ह्याची रहिवासी आहे. शिक्षण १२वी. दलित महिला विकास मंडळ व लेक लाडकी अभियान या संस्थेमध्ये मी गेले १६ वर्षे काम करत आहे. महिलांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी व त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणावी करून देण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो, त्या अंतर्गत आम्ही महिला सक्षमीकरणासाठी बचत गट सुरु केले आहेत. घराला पुरुषांबरोबर स्त्रियांचे पण नाव असले पाहिजे ह्या साठी "घर दोघांचे" हा उपक्रम २५ गावांमध्ये राबवल . २०१९ मध्ये महाराष्ट्रात सातारा सांगली कोल्हापूर भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले होत. तेथील पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन मेडिकल कॅम्प देखील यशस्वीरीत्या राबवले आहेत.