माझे नाव अनिल श्रीपाद गोरे. टोपणनाव - मराठीकाका

पुणे विद्यापीठ गणित मुख्य विषयासह शास्त्र स्नातक ( बी, एस्सी) उत्तीर्ण आणि गणित मुख्य विषयासह शास्त्र पारंगत अभ्यासक्रम पूर्ण पण शेवटची परीक्षा न दिल्याने अनुत्तीर्ण .

८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी गणिताचे खाजगी वर्ग चालवणे हा व्यवसाय. १११ वी १२ वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि कृषी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांची पाठ्यपुस्तके मराठीतून प्रकाशन आणि विक्रीचा जोड व्यवसाय.

महाराष्ट्र राज्याचे भाषा धोरण ठरवण्यात प्रमुख सहभाग. २०१३ पासून राज्य शासनाच्या भाषा सल्लागार समितीचा सदस्य. २०१२ पासून पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती सदस्य. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि दर कराराच्या इंग्रजी प्रतीचे मराठीत भाषांतर. असंख्य जाहिराती, नियमावल्या, शैक्षणिक पाठ्यक्रमातील आशयाचे इंग्रजीतून मराठीत सुमारे १५००० पानांचे भाषांतर केल्याचा अनुभव !