माझी ओळख म्हणजे कुणी व्यक्ति म्हणुन नाही. मी एक मराठीचा पाईक. माझे सर्वस्व म्हणजे मराठीच. जिवंत असे पर्यंत मी महारांजांची आणि स्वराज्याची ’हेर’ म्हणुन सेवा केली आणि आता.. विचार तोच... संघर्ष देखील तोच... त्याच इर्षेने ’माय मराठी’ ला आणि महाराष्ट्राला जगात अजरामर करण्यासाठी झगडत आहे. परंपरा आणि संस्कृतीचा विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी मेळ घालुन मांडतोय मराठीला नव्या रुपात..

सुर नवा.. शब्द नवे.
श्वास नवा.. अर्थ नवे..
हि माय मराठी मातीची नव गाथा..
मन गाई आता ठेकुन चरणी माथा..
मातीत या जन्मलो वाढलो त्या आईला वैभवी नेऊया..
इतिहास तुझा गौरवशाली तो घेउनी सवे..
सामोरी जा त्या भविष्यास जे येई उद्या नवे..
तुज पुढती या मार्गावरती आव्हान असे खडे..
चल टाक मराठी बांधवा पाऊल तुझे पुढे..


ध्यास नवा.. स्वप्न नवे..
यज्ञ नवा.. पर्व नवे..
स्वर्गाहुन सुंदर महाराष्ट्राला घडवुया..
जगी सर्वोत्तम स्थानावरती नेऊया..
आहोत ज्या भुमिची लेकरे त्या आईला वैभवी नेऊया..
हे मर्द मराठ्या शपथ आता शिवबा रायाची..
लढण्याची अन मरण्याची पण जग जिंकुन घेण्याची...
उत्तुंग भरारी घेऊ आता नव क्षितीजाकडे..
चल टाक मराठी बांधवा पाऊल तुझे पुढे..


भाग्याहुन भाग्य हे ती लाभली आई अशी, भुमी अशी..
केले संस्कार ते जोपासवी ममतेतुनी ही संस्कृती..
ह्या सह्य पर्वता सारखा ताठ पाठीचा हा कणा
तुकविल ना कधी मान सोडील ना मराठी बाणा
मन हे विशाल त्या धीर सागरा सारखे भव्य ते
हि प्रेम गंगा सवे शौर्य च्या या इथे वाहते
जन्म नवा.. प्राण नवे..
जोश नवा.. वेध नवे.. ॥
संगीतकार - अजय-अतुल
गीतकार - श्रीरंग गोडबोले

मराठीच्या सेवेसाठी सदैव तत्पर
तुमचा,
बहिर्जी नाईक

mr या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे.