नमस्कार माझे नाव प्रसाद शिवाजी पाटील आहे. मी विज्ञान आश्रमात मध्ये संशोधन सहाय्यक म्हणून काम करत आहे. त्याच प्रमाणे मी मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांच्याबरोबर काम करतो त्याची शिष्यवृत्ती मला मिळते.

मी प्लास्टिक कचऱ्याच्या प्रक्रियेवरील पायरोलेसीस ह्या तंत्रज्ञानावरती काम करतो. टाकाऊ प्लास्टिक पासून उपयुक्त पदार्थ तयार करणे हे ह्या प्रक्रियेच उद्दिष्ठ आहे जसे की तेलनिर्मती करणे. माझे शिक्षण ग्रामीण तंत्रज्ञानामध्ये मास्टर्स सुरु आहे व यांत्रिकी अभियांत्रिकी मध्ये पदवी पूर्ण झाली आहे. ग्रामीण तंत्रज्ञानामार्फत उद्योग निर्मिती व ग्रामीण विकास हे माझे ध्येय आहे.