सदस्य:नूतन इंगळे/NAPCCधू2
राष्ट्रीय जल-वायू परिवर्तन कार्यक्रम
४. राष्ट्रीय अभियान – जल
पाण्याचा जपून वापर, पाण्याचा अपव्यय कमी करणे आणि एकीकृत जलस्रोत व्यवस्थापनाद्वारे पाण्याचे समन्यायी वाटप हे राष्ट्रीय जल अभियानाचे हेतू आहेत. पाणीवापराची कार्यक्षमता २०% नी वाढविण्यासाठी, जल अभियान एक रूपरेषा विकसित करेल. पर्जन्यमान आणि नद्यांच्या प्रवाहातील अस्थिरता यांसारख्या गोष्टींना हाताळण्याची धोरणे ठरविणे गरजेचे आहे. यामध्ये भूपृष्ठावरील आणि भूगर्भीय पाणीसाठा वाढविणे, पर्जन्य-संधारण आणि तुषार व ठिबक अशा अधिक प्रभावी सिंचन व्यवस्था यांसारख्या उपायांचा समावेश आहे.