सर्व प्रथम, मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!

तसेच विकिपीडिया हा मुक्त ज्ञानकोश उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार..!!!

"मराठी" असे आमुची मायबोली... तमाम महाराष्ट्राची मायबोली ही मराठी आहे आणि मराठीच राहणार यात शंका नाही..

​"​माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

असे म्हणत ​श्री संत ज्ञानेश्वरांनी ​ मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे.

​मराठी भाषा ही आद्य काळापासून प्रचलित आहे. असे असले तरीही मराठी भाषेत कालानुरूप बदल झालेले दिसून येतात.

महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये त्या त्या ठिकाणची बोली भाषा वापरली जाते. या सगळ्या बोली भाषांचे मूळ मराठीच. हेच तर मराठी भाषेचे वैशिष्ठय आहे.

या आद्यकालीन मराठी भाषेचा आज गौरव दिन आहे. "मराठी" भाषा उत्तरोत्तर अधिक समृद्ध होवो हीच सदिच्छा...!!

पुनःश्च महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरातील मराठी भाषा प्रेमींना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!!

 धन्यवाद,  जय महाराष्ट्र..