• "खरोसा लेणी"*

खरोसा हे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील गाव. येथील 'खरोसा लेणी' हे ऐतिहासिक ठिकाण. लातूर पासून 40 कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे. खरोसा या गावाच्या पुर्वेस 0.4 कि.मी. अंतरावर टोकडीत हिंदू लेणी कोरलेल्या आहेत. या लयन स्थापत्य व शैलीवरून त्या बदामीच्या चालुक्यांच्या काळातील म्हणजे इ. स. 6-7व्या शतकातील असाव्यात. चालुक्यांच्या शिलालेखात उल्लेखीलेले 'चालुक्य पर्वत' हे खरोशाच्या टेकडीचे प्राचीन नाव होय. येथील अपरिष्कृत (coarse) जांभा प्रस्तारातील ठिसुळ मिश्रणामुळे येथे उत्तम प्रकारचे शिल्प निर्माण होऊ शकले नाही.

  या लेणी समुहात दहा लेणी आहेत. येथील कुरूंद प्रस्तर अतिशय ठिसुळ असल्याने लेणी, क्र. ३, ४, ५, व ६ वगळता इतर लेण्यांमध्ये झीज व पडझड झाल्यामुळे वास्तुशास्त्रीय,शिल्पशास्त्रीय वैशिष्ट्ये नाहीशी झालेली आहेत. 
  या टोकडीच्या माथ्यावर नंतर संत सावतामाळी मंदिर, पीरपाशा दर्गा व रेणुकादेवी मंदिर आहे. या मंदिरासमोर दोन दिपमाळ आहेत. येथे नवरात्रीत मोठी यात्रा भरते. 

{ref} लातूर: वसा आणि वारसा, संपा. जयद्रथ जाधव, लातूर जिल्ह्यातील पर्यटन, लेखक, डॉ. सुनील पुरी }

डॉ. संगीता व्यंकटराव मोरे (चर्चा) १४:५८, १८ नोव्हेंबर २०१९ (IST)