1] डॉ.सुरेंद्र राजाराम शिंदे [परिचय]
संपादनमी,डॉ.सुरेंद्र राजाराम शिंदे एक लेखक,कवी,स्तंभलेखक,पत्रकार,प्रवचनकार,वक्ता,सामाजिक कार्यकर्ता आहे.मला पुरोगामी पत्रकार संघाने महाराष्ट्र भूषण हा मानाचा पुरस्कार देऊन भूषविले आहे.मी,सम्यक बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेचा संस्थापक / अध्यक्ष असून महाराष्ट्र राज्यातील अनेक सामाजिक संस्थांमध्ये सुद्धा सहभागी आहे.
पुणे येथील पुण्यनगरीतील तथागतांच्या विचाराने प्रेरित झालेल्या जगतगुरु संत तुकाराममहाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या देहू येथील चिंचोली गावात 3 ऑक्टोंबर 1969 साली जन्म झाला. शालेय शिक्षण कळवा ठाणे येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. विष्वकर्मानगर,न्युबेलापुर रोडसमोर शांतिदुतबुध्द विहाराजवळ,कळवा ठाणे.- 400605 येथे प्रदीर्घ रहिवास.
शालेय शिक्षणा नंतर पुणे येथे वैदयकिय शिक्षणपूर्ण झाल्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल पुणे येथे वैदयकिय अधिकारी तसेच कुष्ठरोगाविषयी स्पेशल कोर्स उत्तीर्ण होवुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेडीकल ट्रस्ट व अशोक कलानिकेतन पुणे येथे कुष्ठरोगाविषयी वैदयकिय अधिकारी,सेवाधाम ट्रस्ट पुणे येथे राजगुरूनगर,खेड,आंबेगाव,जुन्नर,मावळ तालुक्यातील खेडेगावात वैदयकिय अधिकारी म्हणुन वैदयकिय सेवा पुरवुन राष्ट्रिय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमात वैदयकिय अधिकारी म्हणुन उत्स्फुर्तसहभाग व कुष्ठरोगाविषयी सेवा दिल्याने या राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाचा सन्मानित वैदयकिय अधिकारी म्हणुन गौरव,कुष्ठरोगनिर्मुलन कार्यक्रमात जागतीक आरोग्य संघटनेबरोबर काम करण्याची संधी प्राप्त, कळवा,ठाणे येथे भगत नर्सिंग होमचा निवासी वैदयकिय अधिकारी तदनंतर महाराष्ट्र शासनाच्या त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या वैदयकिय अधिकारी या पदाचा त्याग करून आरोग्य चिकित्सा सोडुन सामाजिक चिकित्सेसाठी हाती लेखणी घेतली.या लेखणीच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्र आपल्या लेखणीच्या साहयाने स्तंभलेखनाने ढवळुन काढला तर आपला स्तंभलेखक, पत्रकार म्हणुन आंबेडकरी समाजात वेगळाच ठसा निर्माण केला. स्तंभलेखक म्हणुन काम करीत असताना परखडपणे आपली जनप्रबोधनात्मक भुमीका मांडताना कोणाच्या धमकीला कधिच भिक घातली नाही किंवा त्यांच्या धमकीमुळे आपले लेखण बदलले नाही.आजपर्यंतदै.वृत्तरत्नसम्राट,दै.लोकनायक,दै.महानायक, दै.विष्वपथ, दै.कोकणसकाळ दै.नवनगर आदी दैनिकातुन तर संपूर्ण भारतात जाणारी आशरा मुक्तांगण या हिन्दी साप्ताहिकातुन उप संपादक म्हणून लेखन केले.मी 50 च्या वर वास्तववादी कविता करून अनेक कविसंमेलनात त्या सादर केल्या आहेत तसेच वृत्तपत्रातूनही प्रकाशित झालेल्या आहेत.
धम्म सारथी या वेबसाइट वरून वे ऑफ लाइफ या अंतर्गत संपूर्ण जगातील 125 देशात उपरोक्त असे 52 ते 60 लेख प्रकाशीत व प्रसारीत झालेले आहेत.आंबेडकरी कवींचा आंबेडकरी अविष्कार म्हणुन सम्मासम्बुध्द साहित्य विचार मंचाने स्मिता पब्लिकेशनव्दारे ‘नव्हती कोणाची हिम्मत’ हि कवीता प्रसीध्द होवुन वर्ल्ड बुक ऑफ गीनीज मध्ये या कवीतेची नोंद झाली.
आरोग्य विभागा अंतर्गत जव्हार येथील तळवडे प्राथमीक आरोग्य केंद्रात वैदयकिय अधिकारी म्हणुन आदीवासी भागात आरोग्यसेवा दिली.
उपरोक्त आरोग्यविषयक बाबीत सामाजीक भान ठेवुन समाजोपयोगी आरोग्यसेवा दिल्यानंतर लेखनात अभीरूची निर्माण झाल्याने व सामाजिक कार्यात रस असल्याने तसेच या भुमीवर निसर्गाने जी निवड केली
2] लेखन
संपादन‘‘ त्यागमुर्ती मातारमाई ’’
संपादनप.पुज्य मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून हा लेख लिहित आहे. मातोश्री रमाबाईंची जिवनगाथा म्हणजे समस्त आंबेडकरवादी अनुयायांच्या माऊलीची जिवनगाथा,हि जिवनगाथा म्हणजेच सुख - दुःखाचा महासागर होय.जगत प्रसिद्ध उच्चविद्याविभुषीत भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,विष्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची अशिक्षित करूणामयी हृदय असलेली पत्नी रामु हिची हि जिवनगाथा होय.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांबरोबर अतिशय गरीबीत दिवस कंठीत करून,दारिद्रयाशी संघर्ष करून शंभर वर्षातून एकदाच जन्मास येणा-या युगप्रवर्तक,महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञारूपी सुर्याची साऊली म्हणुन त्या ठाम उभ्या राहिल्या.त्यामुळेच आपल्याला भिमाई मिळु शकली.समता,स्वातंत्र्य, बंधुता,न्याय मिळु शकला असे म्हटले तर फारसे वावगे ठरू नये.केवळ त्यांच्या पावित्र्यता, कोमलता, भक्ति , औदार्य,धैर्य,धिरोदातत्ता,उदात्तता या कुशलकर्मी पुण्यसंचयामुळेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे नाव जगापुढे आले.याला इतिहासात तोड नाही.
रमाबाईंचे माहेर कोकणातील दापोली जवळील वंदणगांव इथले.आईचे नांव रखमाबाई तर वडिलांचे नांव भिकु धोत्रे होय. पुढे त्यांनी धोत्रे आडनांव बदलुन वंदणकर असे आडनांव लावले.त्यांचे घराणे वारकरी कबीर पंथीय. त्यांना दोन बहिणी व एक भाऊ होता.मोठी बहिण अक्का हिचे लग्न झालेले तदनंतर रमाबाई (रामी)नंती गौरा अन सर्वात लहाण शंकर वडिल भिकु धोत्रे मोठया कष्टाच दगदगीचे कामे करीत असे.आई घरची सर्व कामे करी.घरच्या कामात आईला रखमाबाई मदत करीत असे.
त्यांची आई खुप कश्टाने व तापाने आजारी पडुन अंथरूणाला खिळल्या असता घरची जबाबदारी ओळखुन लहान वयातच रामीने घरची सर्व जबाबदारी अंगावर घेतली.आईवडिलांची सेवा करून भावंडाना सांभाळुन स्वयंपाक करीत असत. रामीचे हे बालवयातीन कश्ट पाहुन त्यांच्या आईचे हृदय हे वत्सलतेने अधिकच भरून येई.अशी हि वत्सलता भावुक होऊन आजारपण वाढुन त्या पती व मुलांना सोडुन गेल्या.तदनंतर पत्नी वियोगाने वडिलांचे आजारपण वाढले. छातीत दुखत असताना खोकला येऊन रक्ताची उलटी होऊन त्यांचेही निधन झाले.त्यावेळी रमाबाई रामी यांच वय फक्त आठ वर्षे तर, गौरा पाच-सहा वर्षाची अन शंकर चार वर्षाचा होता.लहाणपणातच ही बहिणभाऊ आईवडिलांच्या प्रेमाला पारखे झाले.मामा व काका हयांनी त्यांना मुंबईत आणले ते एका चाळीत मुंबईला चुलत्याजवळ एकत्रीत राहु लागले.त्याच सुमारास साता-याहुन सेवानिवृत्त होउन सुभेदार रामजी यांनी मुंबईत डबक चाळीत आपल बि-हाड थाटल.मुबईत डबक चाळीत रहात असताना भिवा इ.9 वी मध्ये शिक्षण घेत होता.त्यांचा थोरला बंधु आनंदराव यांचा विवाह लक्ष्मी यांच्या बरोबर झाला होता.सुभेदार साहेबांच्या मनात भिवाच्या लग्नाचा बेत झुलु लागला.त्यावेळी मुलामुलींचे लग्न बालवयातच होत असत.
सुभेदार साहेबांनी रमार्बाइंस त्यांच्या काकाच्या घरी जाऊन पाहीले असता रमाबाई त्यांच्या पसंतीस उतरल्या अन तिथेच लग्नाची तिथ ठरली.परंतु इकडे भिमरावांसाठी पहिली मुलगी ठरविण्यात आली असता तिच्या नातलगांनी जातपंचायत बसवली. सुभेदारांनी अपराध कबुल करून मुलीस दुशण न देता रमाईचे पोरकेपण जातपंचायत पुढे मांडुन मांडवलीतुन जातपंचायत उठवली.तदनंतर अमृतात न्हाऊन निघालेला तो मंगलदिन उगवला ज्या दिवषी युगप्रवर्तक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा रमाबाई यांच्या बरोबर विवाह झाला. लग्नात अनावष्यक विधींना फाटा देण्यात आला.अंतरपाट धरून महात्मा जोतिबा फुले रचित खालील मंगलाष्टके म्हटण्यात आली. ती येणे प्रमाणे आभारा बहु मानिजे आपुलिया मातापित्यांचे सदा !! मित्रांचे तुमच्या तसेच असनि जे इश्ट त्यांचे सदा !! वृध्दा पंगुस साहय द्या मुली-मुला तशी विद्या शिकवा !! हर्शे वृश्टि करा फुलांची, अवघे टाळी आता वाजवा !! शुभमंगल सावधान !!! भीमरावांनी रमार्बाइंच्या गळयात व रमाबाईंनी भीमरावांच्या गळयात पुष्पमाला घातली.अक्षदा उधळुन वधुवरांवर फुलांची वृष्टी करण्यात आली.त्यावेळी वधु नऊ ते दहा वर्शांची तर वर चौदा पंधरा वर्षांचा होता.
सासरी आलेल्या रमाबाई सारच्या सुस्कार संपन्न वातावरणात एकरूपझाल्या.त्या जरी वयाने लहान होत्या तरी त्यांचा स्वभाव शांत ,सालस व सच्छिल होता.त्याना शिक्षणाचा गंध नव्हता,वडिलधा-या लोकांसमोर आदराने वागणे त्यांचा मानसंन्मान राखणे पतीची मनोभावे सेवा करण हेच स्त्रिचे खरे कर्तव्य आहे असे त्या मानीत.डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न करूनही थोडेफार लिहितावाचता येण्यापलीकडे त्यांची प्रगती होऊ शकली नाही.मात्र पती विव्दान आहे याचा त्यांना सार्थ अभिमान होता.बाबासाहेब रमाबाईंस हाक मारावयाची झाल्यास त्यांना रामु या नावाने साद घलीत असे तर,रमाबाई त्यांना साहेब या संबोधनाने उल्लेखीत असे.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना फक्त एकाच गोश्टीचा ध्यास होता. तो म्हणजे विद्येचा ते 1908 -1909 मध्ये मॅट्रीक पास झाले.बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड हयांची स्काॅलरशिप मिळवुन व रामजी सुभेदारांच्या अथक परिश्रमाने तसेच रमाबाईंच्या पाठींब्याने ते 1983 मध्ये बी.ए. पास झाले.सुभेदारांना अत्यानंद झाला.बडोदे सरकारांच्या ऋणातुन मुक्त होण्यासाठी ते बडोदा येथे नाकरीवर रूजु झाले.इकडे त्यांना पुत्ररत्न लाभले.उभयंताच्या इच्छेनूरूप तसेच महात्मा फुले यांच्या दत्तक पुत्राचे नाव यशवंत म्हणुन आपल्याही मुलाचे नाव यशवंत असे ठेवले.काहि दिवसांनी सुभेदार साहेब आजारी पडले वडिल आजारी आहेत म्हणुन बडोदा येथे तार पाठवली असता ते मुंबईस आले.2 फेब्रुवारी 1993 रोजी सुभेदार रामजी आंबेडकर निर्वतले.
वडिलांच्या निधनानंतर भीमराव हतबध्द झाले.त्यांच्या डोळयासमोर अंधार दिसु लागला.त्या परिस्थितीत रमाबाईंनी पुढे येऊन त्यांना समजावुन दिलासा दिला.दि.4 एप्रिल 1913 रोजी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी अमेरीकेला उच्चशिक्षणासाठी शिष्यवृती मंजुर केली.त्यानुसार तिन वर्षासाठी ते अमेरीकेला रवाना झाले.इकडे बाबासाहेबांच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट अशी होती.बाबासाहेबांचे थोरले बंधु आनंदराव हे एकटेच कमविणारे त्यातच कुटुंबाचा उदरनिर्वाह चाले.अशाही परिस्थितीत रमाबाईंनी धैर्याने तोंड दिले.परंतु पतीच्या शिक्षणाच्या आड त्या आल्या नाहीत,घर सांभाळुन मुलांचे संगोपन करून आल्या त्या परिस्थितीला तोंड देत असे.दिनांक 2 जुन 1995 रोजी बाबासाहेब एम.ए. उत्तीर्ण झाले.अर्थशास्त्रात संशोधन करून पिएचडी.प्राप्त करून ते परतले.घरी परतल्याने रमाबाईंना अत्यानंद झाला.आत्ता आपला पती उत्तम नोकरी करून खुप सारा पैसा कमावेल,घर संसार चालवुन सर्वांना सुखी करेल,आपले सर्वांचे जीवन आनंदमय होईल अशा मनोराज्यात त्यांचे मन वेढुन गेले.परंतु बडोदा सरकारच्या कराराप्रमाणे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर बडोद्यास नोकरीसाठी गेले.इकडे आनंदराव मुळव्याधीने ग्रस्त झाले. औषधोपचारासाठी ते त्यांच्या सासुरवाडीस गेले अन तेथेच त्यांचे निधन झाले.सर्व प्रपंचाची जबाबदारी रमाबाईंवर येऊन पडली.पुढे काही कालावधीने आनंदरावांचा मुलगा गंगाधर याचेही निधन झाले.बडोद्यात जातीयतेचा कटु अनुभव आल्याने व त्यांची सावत्र आई जिजाई आजारी असल्याने ते मुंबईला परतले.मुंईस परतल्यावर जिजाई हिचा मृत्यु झाला.घरात कर्ता माणुस कोणी उरला नसल्याने त्यांनी बडोदा येथील नोकरी सोडुन मुबईतच सिडनेहॅम काॅलेजात प्राध्यापकाची नोकरी पत्करली.परंतु त्यांचे वाचनाकडे दुर्लक्ष झाले नाही.विद्याव्यासंगी असल्याने आपली तहानभुक विसरून ते खोलीचा दरवाजा बंद करून एकटेच वाचनात मग्न होत असत.
प्राध्यापकाची नोकरी करताना पहिल्या पगारातुन 500 रूचे ग्रंथ विकत घेतले.ते ग्रंथ पाहुन रमाबाईंच्या सुखीसंसाराच्या मनोराज्यावर पाणी फिरले. परंतु बाबासाहेबांना ते ग्रंथ प्राणाहुनही प्रिय वाटले.ते ग्रंथ वाचण्यात इतके गर्क होत असे की, जेवणाच्या ताटाकडेही त्यांचे लक्ष लागत नसे तेव्हा रमाबाईंनी पुस्तक बंद करून जेवण वाढलेल्या ताटाकडे निर्देष करून विचारले ‘‘साहेब ! नव-याने बायकोमुलांकडे ,संसाराकडे लक्ष द्यावे असे काही या ग्रंथात लिहिले आहे काय ? तेवढे मात्र वाचुन दाखवा आणि मग तुम्ही खुषाल वाचत बसा’’रमाबाईंचे हे बोलणे ऐकुन साहेबांनी जेवण्यास सुरूवात केली. जुलै 1920 च्या सुरूवातीला छत्रपती शाहू महाराजांची लंडनला उच्चशिक्षण शिकण्यासाठी शिष्यवृती मंजुर झाली झाली .तेव्हा ते लंडनला गेले.रमाबाईंवर पुन्हा एकदा प्रपंचाचा भार आला. घरात विधवा जाउ लक्ष्मीबाई, मिरा आत्या,मुलगा यशवंत,व आनंदरावाचा मुलगा मुकुंद असे सर्वजण एकत्रीत रहात असे. त्यावेळेस रमाबाईंना पुत्ररत्नाचा लाभ झाला.त्याचे नाव गंगाधर असे ठेवले.रमाबाईंना आपल्या पतीच्या ध्येय साधनेसाठी सतत दारीद्रयाशी संघर्ष करावा लागे.त्या पहाटे उठुन शेणाच्या गोव-या थापायच्या सायंकाळी गोव-या विकुन परत येताना सरपणासाठी मार्केटातल्या धांडयाची कांडयांची मोळी डोईवर घेउन यायच्या. पिठाच्या चार भाकरी तिघांस तिन व उरलेली एक भाकरी तिघी मिळुन खात असत कधी अर्धे पोटी तर कधी उपाषी राहुन त्या दिन निभावुन नेत असत तरी त्या साहेबांना पत्र लिहुन सर्व खुषाल आहेत असेच कळवित असे.इकडे गंगाराम खुप आजारी पडला औषधपाण्या विना त्याचाही मृत्यु झाला.अशा परिस्थितीत त्यांची हि दैन्यावस्था पाहुन समाजसेवकांनी रमाबाईंना पैसे देण्याची बोलणी केली. परंतु रमाबाईंनी आपल्या पतीची मान खाली जाईल यामुळे कोणाचा छदाम स्विकारला नाही.तेव्हा सदर समाजसेवकांनी बाबासाहेबांच्या थोरल्या बंधुस बाळारामांस विणविण्या करून कुटुंबात राहण्यास भाग पाडले. बाळाराम नोकरीला असल्याने व कुटुंबात एकत्र राहु लागल्याने कुटुंबाचे हाल कमी झाले.
साहेब आपला लंडन येथील अभ्यासक्रम पूर्ण करून मुंबईस परतणार तेव्हा एक बातमी आली.ती म्हणजे साहेबांची बोट बुडाली.तेव्हा घरात दुःखाचे वातावरण निर्माण झाले.परंतु रमाबाईंनी धिरोदात्तपणे‘‘माझे कुंकु बळकट हाय अस्पृष्यता निवारण्यासाठी युगप्रवर्तक प्रज्ञारूपीसुर्य हा झाकाळणारा नाय, अस्पृष्यता निवारण्यासाठी तेजोमय प्रकाषाने हा प्रज्ञारूपी सुर्यअधिकाधिक तळपणारा हाय-’’ असे ठणकावुन सांगीतले.नंतर एकाने बातमी आणली जी बोट बुडाली त्यात बाबासाहेब नव्हते तर त्यांचे ग्रंथ असलेली बोट बुडाली.या बातमीने सर्वांना हायसे वाटले.रमाबाईंच्या डोळयातुन आनंदाश्रुंनी वाट मोकळी केली.
बाबासाहेब येणार म्हणुन बाळारामांनी सर्वांना कपडे केले.रमाबाईंना नवीन लुगड आणण्यासाठी पैसे दिले असता त्यांनी स्वतःसाठी काहीही खरेदी नकरता साहेबांसाठी एक धोतरजोडी,एक गादी व एक उशी अन जेवावयास एक पाट खरेदी केला.केवढा हा त्यांचा पतीविषयी भक्तीभाव.साहेबांना बंदरावरून आणण्यासाठी स्वागतासाठी सर्वजण गेले.तेथे बाबासाहेबांना रमाबाई सोडुन सर्वजण दिसल्याने उन्मळुन आले अगदी विषन्न अवस्थेत असताना अचानक समोर रमाबाई दिसल्या. रमाबाईंनी छत्रपती शाहु महाराजांनी दिलेला मानाचा फेटा शालु म्हणुन नेसुन बाबासाहेबांच्या स्वागताला आल्या.दोघांची दृश्टी एकमेकांवर पडताच दोघांनाही भारावुन आले. रमाबाईंच्या डोळयांतुनी आनंदाच्या अश्रुधारांनी वाट मोकळी केली तर, बाबासाहेबांनाही आपल्या नयनातले अश्रु झाकता आले नाही. घरी परतल्यावर रमाबाईंनी बाबासाहेबांस पंचारतीने ओवाळले.महापुरूषाच्या जिवनातल्या अश्या या त्यांच्या सुजाण,सालस पत्नीची कहाणी. आंबेडकरी इतिहासात याला तोड नाही.त्यांना एकुण पाच अपत्ये झाली.परंतु यशवंत हाच तेवढाच वाचला. बाकीचे गंगाधर,रमेश,राजरत्न,व मुलगी इंदु ही सर्व मुले वर्षा- सव्वावर्षाची असतानाच मरण पावली.बाबासाहेबांना संतती सौख्य लाभले नाही.रमाबाईंनी ते सर्व दुःख पचविले.मातृत्वाचे बुस्ज ढासळत असतानाही त्या डगमगल्या नाही किंवा बाबासाहेबांच्या शिक्षणाच्याही आड आल्या नाहीत.मोठया धिराने आलेल्या बिकट परिस्थीतीशी त्यांनी संघर्श केला.त्यांचे उभे आयुश्य हाल अपेश्टात ,कश्ट उपसण्यात, संकटे व दुःख यांच्याशी झगडण्यात गेले.बाबासाहेबांनी ग्रंथालयासाठी अन रमाबाईसाठी राजगृह बांधले तेथे ते रहावयास गेले.रमाबाई त्यांच्या बाळंतपणामुळे ,अतिकश्टाने, दारिद्रयाने,बिकट परिस्थितीने पोखरल्या होत्या.त्यामुळे त्या खंगत चालल्या होत्या.एके दिवशी साहेबांनी त्यांना दागदागीने केले.रमाबाई दागदागीने परिधान करीत असताना साहेबांनी मुद्यामहुन त्यांचा कुंकवाचा करंडा लपवला.दागदागीने घातल्यावर कुंकु लावण्यासाठी करंडा सापडत नाही म्हणुन त्या बेचैन झाल्या.तेव्हा बाबासाहेब त्यांना म्हणाले ऐवढे सर्व दागदागीने असता करंडा कषासाठी पाहिजे ? तेव्हा त्या म्हणाल्या ‘‘कपाळावरच कुंकु हे माझं सौभाग्याचं लेण हाय,समद्या दागदागीन्या परीस ते माझ सौभाग्याच लेण मला अधिक मोलाचं हाय !’’साहेबांकडे दररोज माणसांची गर्दी होत असे. आता साहेब अस्पृष्यता निवारण्याच्या कामात मग्न असत. दररोज कोठे ना कोठे त्यांची भाषणे असत.आत्ता ते पद्दलितांचे नेते झाले.तर माता रमाबाई या सर्वांची माऊली झाल्या. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती बिघडत चालली. औषधोपचार चालु होताच परंतु त्यात काही सुधारणा येत नव्हती.त्यात बाबासाहेबांना गालमेज परिषदेला उपस्थित रहाण्यासाठी बोलावणे आले असता त्यांनी डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रकृती स्वास्थासाठी रमाबाईंना धारवाडला वस्तीगृही पाठवीले.
वस्तीगृहात वराळे यांच्याकडे राहत असता वस्तगृहात निरव शांतता दिसली.त्याचे कारण विचारले असता सरकारी अनुदान प्राप्त न झाल्याने वाणी माल उधार देईनासा झाल्याने,वस्तीगृहातील मुलांवर उपासमारीची पाळी आली.तत्काल त्यांनी हातातील चार सोन्याच्या बांगडया काढुन वराळेंना दिल्या व वाण्याकडुन सामान आणवुन स्वयंपाक करून मुलांस भरविले.साहेब गोलमेज परिशदेहुन आल्यावर साहेबांचा महाडच्या चवदार तळयाचा सत्याग्रह,काळाराम मंदिर सत्याग्रह,इ. सत्याग्रह चालुच होते.साहेब देशातील विषमता,धर्मांधता व अन्यायाशी भांडत होते. साहेबांना अधुनमधुन धमकिचे पत्र येत असे त्यामुळे रमाबाईंच्या काळजात धस्स होत असे.त्या साहेबांविषयी चिंता करीत. चिंताच रमाईंचे रक्त आटवित होती.मनाला शांती नव्हती.त्या काळजीने तडफडत,त्यांना स्वस्थता नव्हती.,झोप लागत नव्हती,जेवण गोड लागत नव्हते. त्यामुळे त्या खंगुन आणखीणच आजारी पडल्या. त्या अवस्थेतही त्या बाबासाहेबांना म्हणाल्या आपण पंढरपुरास जाऊन विठोबाचं दर्शन घेऊ परंतु बाबासाहेब रमाबाईंची समजुत घालताना म्हणाले ‘‘जेथे भक्तांना विठोबाचे दर्शनही मिळत नाही ते पंढरपुर काय कामाचे तु खंत करू नकोस ! त्यागपूर्ण जीवन घालवित, सदाचारी राहुन आपण दलितांची निरपेक्ष सेवा करू आणि इथेच प्रतिपंढरपुर निर्माण करू !!’’
रमाबाई अंथरूणात खिळुन होत्या.22 मे 1935 रोजी रमाबाईंची प्रकृती अचानक बिघडली.साहेब पनवेलहुन आले.डाॅक्टरांचे औषधोपचार चालुच होते.परंतु औषधोपचाराची मात्रा लागु पडत नव्हती.साहेब रमाबाईस म्हणत ‘‘रमा जिथुन जगायला प्रारंभ करायचा तिथुनच तु मरणाची भाषा बोलतेस, जिथुन प्रकाशायच तिथुनच तु विझल्याची भाषा करतेस,तुझा माझा दिवस आता कुठे उगवला आहे. रमा तु जाऊ नकोस,रमा तु गेलीस तर माझ घरच मोडुन जाईल.तुझे माझ्यावर फार मोठे कर्ज आहे.मी काहीही केलं तरी ते फिटणार नाही.’’ साहेब भारावलेल्या हाताने रमाईंस औषध देत,काॅफी देत,मोसंबीचा रस देत॰ साहेब रमाईंच्या जवळच बसुन राहत.त्यांना जवळ बसलेले पाहुन रमाईस फार बरे वाटे,त्यांना आपल्या पतीशी खुपखुप बोलावेसे वाटे परंतु कंठातुन शब्दच बाहेर पडत नव्हते फक्त मुक्या वेदनाच बोलत होत्या.साहेबांची तेजपूंज मुर्ती हृदयात साठवुन ठेवण्याच्या प्रयत्नातच रमाईंनी डोळे झाकले.त्या अनंतात विलिन झाल्या.साहेबांचा दुःखाचा जणु बांधच फुटला होता.त्यांनी रामु,रामु टाहो फोडला. 27 मे 1935 रोजी सकाळी 9 वाजता ही आर्त किंकाळी कितीतरी वेळ सा-या राजगृहात घुमतच राहीली.
सिध्दार्थ गौेतमांच्या जीवनात जे अनमोल स्थान माता यशोधरेला आहे तेवढेच स्थान बाबासाहेबबांच्या जीवनात माता रमाबाईंना आहे.सिध्दार्थांच्या बुध्दत्व प्राप्तीच्या आड माता यशोधरा कधीच आल्या नाही,त्याच प्रमाण रमाबाई सुध्दा डाॅ.बाबासाहेबांच्या दलितोध्दारक व अस्पृष्योन्नती कार्यात कधीच आड आल्या नाही.सिध्दार्थासाठी माता यशोधरा चंदनासारखी झिजली तशाच रमाबाई सुध्दा डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांसाठी अहोरात्र झिजल्या. त्या दाघींचेही जिवनमान एकसमान आहे.
रमाबाईंच्या समर्पीत जीवनामुळेच बाबासाहेबांच्या जीवनाला त्यांच्या कर्तृत्वाला एक आकार येऊ शकला, रमाबाईंच्या आधारामुळेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आल्या आयुश्याचा प्रत्येक क्षण समाजासाठी देऊ शकले हजारो वर्षे उपेक्षीत जीवन जगणा-या समाजाला स्वाभिमानाने जगण्याची शिकवण देऊ शकले.अशा या थोर माऊलीस कोटी कोटी प्रणाम करून त्यांच्या त्यागपूर्ण जिवनमानाच्या आदर्श प्रेरणेस हा लेख समर्पीत करतो. माता रमाईंच्या कार्य विचारांस माझे त्रिवार अभिवादन.
3] कविता
संपादनप्रज्ञासूर्याची साऊली
संपादननका सोडुनी जाऊ हो मजला
साहु किती मी एकटी या संसाराला
काय सांगु मी या यशवंताला
घाबरत नाही मी,अपार कष्टाला
नका सोडुनी जाऊ हो मजला ............!! धृ !!
लाभो आयुश्य माझ्या कुंकवाच्या धन्याला
येऊ दे सुखरूप बोट तयांची मुंबईला
नसे ही ददात उदयाच्या सूर्य उगवण्याला
येइल बळ तयांच्या अस्पृष्यतःनिवारण्या कार्याला
नका सोडुनी जाऊ हो मजला ............!! 1 !!
अन्नापरीही पुस्तक हे प्रिय धन्याला
आहे हा देह आकार देण्या प्रज्ञासूर्याला
नाही हटकले त्यांना मी विलायतेला जाण्याला
ठेवा सय आहे ही अडाणी रामु बॅरीस्टराला
नका सोडुनी जाऊ हो मजला ............!! 2 !!
देई धनी महत्व हो पुस्तक वाचण्याला
कसा करावा संसार वाचुनी सांगावे मजला
जोडुनी ठिगळ,नेसुनी लुगड,लागले मी संसाराला
प्रज्ञेपायी भरवले हाथ मी गव-या थापण्याला
नका सोडुनी जाऊ हो मजला ............!! 3 !!
देईन महत्व मी कोरातल्या चतकोर भाकरीला
नाही मागणार पैका मी औषधपाण्याला
गमवणार नाही मी वणंदकर-सकपाळांच्या स्वाभिमानाला
दागीन्यापरी महत्व असे हो कुंकु लेण्याला
नका सोडुनी जाऊ हो मजला
साहु किती मी एकटी या संसाराला