मी नौरोजी वाडिया महाविदयालय येथे संगणकशास्त्र विभागामध्ये विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक म्हणून काम करत आहे. माझा विषय गणित असून मी गेले तीस वर्षे मी शिक्षणक्षेत्रामध्ये काम करत आहे.

याच बरोबर गेले पंचवीस वर्ष मी सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रामध्ये काम करत आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध 'पुणे मराठी ग्रंथालय' या संस्थेच्या कार्यकारी मंडळावर मी काम करीत आहे. ग्रंथालयाच्या कार्याध्यक्ष, कार्यवाह अशा विविध पदांवर काम केले आहे. सध्या मी ग्रंथालयाचा कोषाध्यक्ष म्हणून काम करीत आहे.