[[चित्र:धोत्री किल्ला.jpg|इवलेसे|
धोत्री किल्ला
१.प्रस्तावना:
महाराष्ट्राला ज्या पद्धतीचा भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक व राजकीय पद्धतीचा दैदिप्यमान असा वारसा लाभलेला आहे, हे पाहून कोणाचाही उर अभिमानाने भरून येईल. महाराष्ट्राचा किंबहुना भारताचा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवलेला इतिहास हा आपल्याला त्याच्या वैभवशाली वास्तुवरून नक्कीच पाहता येईल . महाराष्ट म्हंटले की गढ किल्ले हे आलेच आणि महाराष्ट आणि गढ किल्ले हे समीकरण आलेच. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देण्यासाठी हे गढ किल्ले जागोजागी आपले स्वागत करण्यासाठी सज्ज्य आहेत. ते आपल्या आजूबाजूलाच असतात पण आपण त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नाही. सोलापूर जिल्यातही असे अनेक छोटे-मोठे गढ किल्ले अस्तित्वात आहेत. असाच एक गढ किल्ला म्हणजे दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री या गावी असणारा गाधीवजा किल्ला होय. या किल्ल्याचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आखीव,रेखीव,भक्कम आणि छोटेखाणी रूपं. पण तसे हा किल्ला पर्यटकांच्या आणि शासनाच्या नजरेपासून फार काळापासून दुर्लक्षित राहिला आहे.
२.मुख्य प्रवेशद्वार :
धोत्री गावातून किल्ल्याच्या एका भव्य बुरुजाला वळसा घालून आपण किल्लयाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येतो.हे प्रवेशद्वार पाहताच आपल्याला चटकन लक्षात येईल की, ताठ मानेने व भरभक्कमपणे उभे राहिलेले हे प्रवेशद्वार या किल्ल्याच्या रक्षणासाठी सदैव तत्पर आहे. हे मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे. तब्बल १२ फूट उंचीचे हे मुख्य प्रवेशद्वार पर्यटकांचे मोठ्या अदबीने स्वागत करते. या प्रवेशद्वाराची थोडी मोडतोड झाली आहे पण याचे नवीन लाकडी प्रवेशद्वार आपले मन मोहून टाकते. प्रवेशद्वारातील तटबंदीत सज्जा आहे.
३.मुख्य मैदान :
प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूंना देवड्या आहेत. प्रवेशद्वाराच्या समोरचे १००×१०० फूटाचे भव्य चौकोनी मैदान आहे. या मैदानाच्या चारही बाजूंना पूरातन वास्तू व खोल्यांचे अवशेष मिळतात.स्थानिक लोकांचे असे म्हणणे आहे की, येथे जवळपास ७० खोल्या होत्या. कदाचित हा एखाद्या सुमांतचा अथवा सुभेदाराचे वास्तवाचे ठिकाण असेल, जो त्याला त्याच्या कामगिरीवरून एखाद्या राजाकडून मिळाला असेल. पण हा किल्ला नेमका कोणाचा याबाबत नेमकी अशी माहिती नाही.
४.बांधकाम :
या किल्ल्याच्या सर्व तटबदीच्या व बुरुजांच्या भिंती या पांढर्या मातीच्या बनवलेल्या आहेत. त्याच्या आतील व बाहेरील बाजूस संरक्षणासाठी दगड व विटा लावलेल्या आहेत. बुरुज व तटबंदीत जागोजागी जंग्या आहेत. पण कुतूहल या गोष्टीचे वाटते की, आजुबाजूच्या परिसरात मुख्यत्वे काळी जमीन आढळते. पुढे प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर उजव्या बाजूस तटबंदीत बालेकिल्ला पूर्व दिशेला मुख करून उभा आहे. येथून पुढे आत गेल्यावर जुनी दगडी बांधकामाची व पायर्या असलेली एक विहीर आहे. साध्या ती कोरडी आहे. बालेकिल्ल्याला चार बुरुज आहेत. दक्षिण बुरुजावर जाण्यासाठी छान वळणदार जीना आहे. जिन्यावरून वर गेल्यावर संपूर्ण किल्ला आणि किल्ल्याची एकूनेक रचना समजते.
५.गुप्त मार्ग :
प्रत्येक किल्ल्याप्रमाणे या किल्ल्यालाही काही गुप्त पळवाटा आहेत. येथे देखील एक गुप्त मार्ग आहे जो थेट जातो तो अक्कलकोटच्या किल्ल्यापर्यंत. अशा पद्धतीने हा ५००×३५० फुटाचा भव्य किल्ला पर्यटकांची भूक भागवतो.