लोककला "भारुड"

संपादन

ईतिहास

संपादन

महाराष्ट्र ही संतांची व समाज सुधारकांची भुमी आहे. महाराष्ट्रीय सामाजिक संस्कृतीला भागवत धर्म ही एक मीळालेली मोठी देणगी आहे. या संत भुमीत विविध संतांनी भागवत धर्माची पताका खंबीरपणे रोवली आहे. विठ्ठल भक्तीने भरभरुन वाहिलेले विठ्ठल भक्तीचा कुंभ म्हणजेच भागवत धर्म होय. भागवत धर्माचा पाया संत ज्ञानेश्वर महारांजांनी रचला तर कळस संत तुकाराम महाराजांनी चढवला.

"ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस"

 
लोककला "भारुड" .,,


असा उल्लेख धार्मिक ग्रंथात आढळून येतो. या मधे संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत चोखा मेळा, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत कान्होपात्रा, संत जनाबाई, संत तुकाराम, अशा अनेक संतांनी विठ्ठल भक्तीच्या माद्यमातून महाराष्ट्राची तत्कालीन सामाजिक व सांस्कृतिक जडण-घडण वारकरी सांप्रदायाच्या माद्यमातून केली. हीच परंपरा आजही कायम आहे. ही जडणघडण करीत असताना. सर्व संतांनी अभंग, गवळण, भारुड, हरीपाठ अशा संत वांग्ड.मयाची निर्मिती करुन. महाराष्ट्र ही संतांची भुमी म्हणून. आगळी वेगळी ओळख जगात निर्माण झाली आहे. दरम्यान संतांनी पद्य, गद्य, लळीत असे विविध प्रकारचे साहित्य लेखन केले. परंतु काही ठराविक संतांनीच "भारुड" या प्रकाराचे लिखाण पद्य स्वरुपात केले आहे. भारुड हा पद्य वांग्ड.मयाचा प्रकार आहे. या मधे संत एकनाथ महाराजांनी साडे तीन हजाराहुन अधिक भारुड लिहिले आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनीही काही प्रमाणात पद्य रचना लिहील्या आहेत. अथर्वशीर्षांच्या रचनेचा काळात. म्हणजे सुमारे "भारूड" हा शब्द किमान २००० वर्षे इतका प्राचीन असण्याची शक्यता आहे. भारुड या शब्दाचा अर्थ "बहुरुड" असा आहे. याचाच अपभ्रंश होऊन पुढे "भारुड" या शब्दाची उत्पती झाली. याच भारुडाची परंपरा २००० वर्षांपासुन. आजतागायत महाराष्ट्रात व महाराष्ट्रा बाहेरही सातासमुद्रापार वारकरी सांप्रदायाने अखंडपणे जपली आहे. या मधे संत एकनाथ महाराज लोकांचे प्रभोधन करत असताना. ते भजन, प्रवचन, किर्तनाच्या माद्यमातून प्रबोधन करत असे. परंतु लोक ऐकण्यासाठी थांबत नसे. परिणामी ते येतही नसे. म्हणून पद्य ओळींना मनोरंजनात्मक शब्दरुपांतर करुन.समाज प्रबोधन करण्यासाठी भारुडाची निर्मिती प्रथम संत एकनाथ महाराजांनी केली.

 
लोककला "भारुड" देविदास जगाताप.,,

विंचू चावला सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार

अग, ग ..... विंचू चावला

देवा रे देवा ..... विंचू चावला

आता काय मी करू ..... विंचू चावला

अग, ग ..... विंचू चावला

अग बया, बया ..... विंचू चावला

अरे विंचू चावला, रे विंचू चावला, रे विंचू

चावला, हो

महाराज, महाराज काय झाले काय

एकाएकी ?

काम, क्रोध विंचू चावला

तम घाम अंगासी आला

त्याने माझा प्राण चालिला

मनुष्य इंगळी अति दारुण

((हा, हा, म्हणजे अति 'दारू' नं)

दारूचा आणि इंगळीचा काही संबंध नाही.

दारूण म्हणजे भयंकर.

(भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का ?)

अभ्यंकरचाही संबंध नाही, अभ्यंकर नव्हे,

भयंकर म्हणजे अति भयंकर.

(अति भयंकर म्हणजे ?)

खूप भयंकर.

(अन्‌ खूप भयंकर म्हणजे ?)

मायंदाळ भयंकर.

(अन्‌ मायंदाळ भयंकर म्हणजे ?)

तुझा दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल

तेवढं भयंकर.

(बापरे !)

मनुष्य इंगळी अति दारूण

मज नांगा मारिला तिनं .....

(तिनं म्हणजे त्या खालच्या आळीतल्या गंगीनं.)

गंगीचा इथे काय संबंध ?

(मग त्या रंगीनं.)

कुणाचाही संबंध नाही.)

तिनं म्हणजे त्या इंगळीनं

(महाराज इंगळी म्हणजे ?) ..... मोठा विंचू !

(अंदाजे केवढा ?) ..... तुझ्याएवढा ! मनुष्य इंगळी अति दारूण

मज नांगा मारिला तिनं

सर्वांगी वेदना जाण, त्या इंगळीची

या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा (तंबाखु खाणं मागे सारा)

नाही, नाही, या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा

तमोगुण म्हणजे काय ?

गर्वाने जर छातीचा फुगा फुगला असेल तर,

पिन लावून थोडीशी हवा कमी करा.

सत्वगुण लावा अंगारा, अन्‌ विंचू इंगळी उतरे झरझरा

सत्य उतारा येऊन (आला का ?)

अवघा सारिला तमोगुण

किंचित राहिली फुणफुण, शांत केली

जनार्दने

पुंडलीक वरदा (हरी विठ्ठल)

श्री ज्ञानदेव (तुकाराम)

पंढरीनाथ महाराज की जय


भारुडाच्या माद्यमातून समाजातील अंधश्रध्दा व विविध अनिष्ठ चाली-रुढी परंपरांवर व्यासनांवर प्रहार व भाष्य करणारे भारुडाची रचना करण्यात आली. जनार्धन स्वामीं यांनीही भारुडाच्या रचना लिहिल्या आहेत त्यातीलच एक रचना पुढीलप्रमाणे आहे.


" सत्वर पाव ग मला "

सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहिन तुला ॥१॥

सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥

सासू माझी जाच करिते । लौकर निर्दाळी तिला ॥३॥

जाऊ माझी फडाफडा बोलति । बोडकी कर गं तिला ॥४॥

नणंदेचं पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे त्याला ॥५॥

दादला मारून आहुति देईन । मोकळी कर गं मला ॥६॥

एका जनार्दनि सगळेच जाऊ दे । एकलीच राहू दे मला ॥७॥

वरील भारुडामधे समाजातील एकलकोंडी जीवन जगणाऱ्या स्त्रीचे कुटुंबा विषयीचे मनोगत व्यक्त करणारे भारुड आहे. महाराष्ट्रात पुरुषांच्या बरोबरीने महिलांही मोठ्या प्रमाणात तेवढ्याच धाडसाने भारुडाचे कार्यक्रम सादर करतात. संत साहित्याच्या अभ्यासक गंगूबाई जाधव, लक्ष्मीबाई गिराम आणि चंदाबाई तिवाडी या स्त्री-भारुडकर्त्या भारुडे सादर करतात. भक्तीरुपी भारुडाचे रुपांतर बदलत्या काळानुरुप कलेत झाले. कलेतूनही लोक कलेत झाले. भारुड हे भागवत धर्मातील समाज मनाचे यथायोग्य चित्रण म्हणून लोककलेचे एक प्रभावी माद्यम ठरत आहे. यात व्यावसायीक भारुडकारांचीही संख्या दिवसेंदिवस वाढु लागली आहे. भारुडामधे भजनी, विनोदी, एकनाथी, सोंगी हे भारुडाचे प्रकार आहेत. सद्यस्थित सोंगी, विनोदी व भजनी भारुडाचे भारुडकार मोठ्याप्रमाणात सादरीकरण करताना दिसत आहे. परंतु भारुडाला म्हणावा तसा लोकाश्रय व राजश्रय मीळाला नाही. त्यामुळे भारुड ही लोककला लोपपावत चालली. परंतु बदलत्या काळानुसार भारुडाचे स्वरुपही बदलु लागाले. हरीनाम सप्ताह, गणपती, शारदा महोत्सव या सार्वजनिक व घरगुती कार्यक्रमातही भारुडाचे कार्यक्रम होतात. त्यामुळे भारुडाला लोकाश्रय मीळतोय म्हणायला हरकत नाही. लोकाश्रया बरोबर स्वातंत्र्या नंतर महाराष्ट्र राज्य शासनाने सांस्कृतिक मंत्रालयाच्या माद्यमातून भारुडाला लोककलेचा दर्जा देण्यात आला. या माद्यमातुन भारुडाला राजाश्रय मीळाला. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने राज्यात लोककला माहिती संकलन दुसऱ्या टप्प्याचे काम सुरु झाले. या मधे सोलापूर जिल्ह्यातील भारुड या लोककलेचे संकलन व संशोधन करताना. आम्ही प्रथम उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथे माहिती संकलनासाठी गेलो. तिथे हरीनाम सप्ताहाच्या सांगता निमित्त भारुडाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या मधे माढा तालुक्यातील दादा कापसे यांनी. सोंगी भारुड सादर केले. या मधे

१) "मला दादला नको गं बाई."

२) "तुला बुरगुंडा होईल गं."

सोलापूरातील भारुड लोककला

संपादन

मोहोळ तालुक्यातील विरवडे येथील दिनकर आवताडे, पांडुरंगाची काशिनाथ पवार, यांनी.भारुड सादर केली.दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी येथील यांनी डोणगांव (ता. दक्षिण सोलापूर) येथे भारुड सादरीकरण केले. या नंतर मोहोळ येथे गवत्यामारुती नवरात्र महोत्सव मंडळाने विविध लोक कलाकारांचा कार्यक्रम होता. या मधे शिंदे यांनी जनार्धन स्वामी यांनी रचलेले.

१) "सत्वर पाव गं मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला."

हे भारुड सादर करीत. समाजातील एकलकोंड्या जीवन जगणाऱ्यांची जीवन शैलीचे वर्णन करणारे भारुड सादर केले.

तिसरे भारुडा मोहोळ तालुक्यातील सौंदणे(कट) येथे नवरात्र महोत्स्वा निमित्त उत्तर सोलापूर तालुक्यातील केगाव येथील निवृत्त पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील व देविदास जगाताप , सरस्वती आगलावे व सहकाऱ्यांचे भजनी भारुड सादर करण्यात आले. या मधे नागनाथ पाटील यांनी.देविदास जगताप, सरस्वती आगलावे, विविध भारुडाच्या माद्यमातून उपस्थितांच्या डोळ्यात झणझणीत भारुडरुपी अंजन घालून समाज प्रबोधनपर सादरीकरण केले. भारुडाचे सादरीकरण केले. भारुडाचे सादरीकरण करताना, टाळ, मृदंग, पेटी, चाळ, व आवश्यकतेनुसार विविध साहित्याचा वापर करण्यात आला. बदलत्या काळानुसार संतांनी रचलेल्या भारुडाच्या गायकीत चित्रपट गीतांची धुडक्या चालीतही सादर केले जात होते. हे भारुडातील होणारा काळानुरुप बदल म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

 
लोककला "भारुड"

सोलापूर जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र पंढरपूर म्हणजे जगातील दक्षिण काशी होय. भागवत धर्मातील देवाधिदेव श्री विठ्ठलाच्या पददर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, गोवा, तेलंगणा अशा भारतातील विविध राज्यातून लाखो विठ्ठल भक्त पंढरपूर येथे मोठ्या भक्तीभावाने येतात. पंढरपूर येथे काकडा आरती, भजन, भारुड, किर्तनात लाखो भाविक तल्लीन होवून. देहभान विसरुन विठ्ठलमय होतात. सात्त्विक विचाराची शिदोरी उराशी बांधुन. मणुष्य प्राणी

देव पहावयाशी गेलो

देवची होवून ठेलो......!

याची प्रचीती विठ्ठल भक्ताला येते. म्हणून भजन किर्तन, प्रवचन व भारुडाला भागवत धर्मात आनन्य साधारण महत्व आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मोहोळ, माढा, मंगळवेढा, माळशिरस, बार्शीसह विविध तालुक्यात उत्कृष्ठ पारंपारीक भारुडकारांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. या मधे पुरुष व महिला भारुडकारही आहेत. पंढरपूर येथील चंदाताई तिवाडी यांनी भारुडाला सातासमुद्रापार पोहोचवले आहे. आसे अनेक भारुडकार सोलापूर जिल्ह्यात आहेत. म्हणून सोलापूर जिल्ह्यातील भारुडाला सर्व ज्ञानपीठावर महत्वाचे व मानाचे स्थान दिले जाते हे विसरुन चालणार नाही.