माझे नाव कविता श्रीकांत वड्राळे . सध्या मी यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल स्टडीज मध्ये सहाय्यक संचालक / सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे.

माझे मूळ गाव कोल्हापूर जिल्यातील गडहिंग्लज तालुक्यामधील 'हलकर्णी ' आहे .

हे गाव महाराष्ट्र - कर्नाटक या दोन राज्यातील सीमे वरती आहे. हे गाव 'तापकीर' साठी प्रसिद्ध आहे. माझ्या गावात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व उर्दू शाळा व हाय स्कूल आहेत. तसेच पोस्ट ऑफिस, राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था, पोलीस स्टेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी आहेत. गावचे ग्राम दैवत 'रामलिंग' आहे. गावचा आठवडी बाजार 'बुधवारी असून त्या करता गावच्या जवळपास असणाऱ्या गावातील लोक आठवडी बाजारसाठी येतात.