श्री अरविंद घोष लिखित सावित्री : एक आख्यायिका आणि एक प्रतीक या महाकाव्यातील सत्यवान ही एक मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे. महाभारतातील सावित्री आख्यान-कथेचा संदर्भ यास आहे.

महाभारतील संदर्भ संपादन

शाल्व देशाचा अंध राजा द्युमत्सेन याचा पुत्र म्हणजे सत्यवान. राजा अश्वपतीची कन्या सावित्री वरसंशोधनासाठी जाते तेव्हा ती सत्यवानाची निवड करते, तेव्हा सत्यवान व त्याचे कुटुंबीय हे अज्ञातवासात जीवन जगत असतात. सत्यवान अल्पायुषी आहे आणि एका वर्षात त्याला मृत्यू येणार आहे अशी भविष्यवाणी नारदमुनी यांनी केलेली असते, तरीही सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहते. सावित्री मृत्यूशी लढा देते आणि सत्यवानाचे प्राण परत मिळविते. सत्यवान-सावित्री हे जोडपे दाम्पत्य-प्रेमाचे प्रतीक मानले जाते.

रूपकात्मक अर्थ संपादन

श्रीअरविंद यांनी त्याला रूपकात्मक प्रतीक बनविले. सत्यवान म्हणजे सत्याचे मनुष्यरूप. तो या मर्त्य नश्वर जगात सत्याची प्रतिष्ठापना करू पाहणाऱ्या मानवाच्या विफल प्रयत्नांचे रूपक आहे.

संदर्भ संपादन

संक्षिप्त सावित्री, ले.माधव पंडित, अनुवाद - सुहास टिल्लू

बाह्य दुवे संपादन