सचिन तेंडुलकरच्या क्रिकेटमधील विक्रमांची यादी

या लेखात ख्यातनाम भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने आपल्या कारकिर्दीत केलेल्या विविध विक्रमांचे संकलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Sachin Tendulkar at Isha Gramotsavam 2015.jpg
Sachin Tendulkar (2667284068).jpg

कसोटी क्रिकेटसंपादन करा

पदार्पणसंपादन करा

 • सचिनने पदार्पण केले तेव्हा कमी वयात कसोटी पदार्पण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाकिस्तानच्या मुश्ताक मोहम्मद आणि आकिब जावेदनंतर त्याचा क्रमांक लागत होता. भारताकडून पदार्पण करणारा तो सर्वात लहान खेळाडू होता आणि आजही आहे. पाकिस्तानच्याच हसन रझाने ऑक्टोबर १९९६ मध्ये वयाची १५ वर्षेही झालेली नसताना पदार्पण केले आणि या यादीत पहिला क्रमांक पटकावला. जन्मतारखेवरून वाद झाल्याने पाकिस्तानने नंतर आपला दावा मागे घेतला. [१]

कारकीर्दसंपादन करा

 • कसोटी कारकिर्दीमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज : १५ हजार ५३३ धावा.
 • बारा हजार कसोटी धावांचा (आणि मग तेरा, चौदा व पंधरा हजारांचाही) पल्ला गाठणारा पहिला जागतिक फलंदाज.
 • दहा हजार कसोटी धावांचा टप्पा सर्वात कमी डावांमध्ये गाठण्यात संयुक्त प्रथम स्थान. तेंडुलकर व ब्रायन लारा या दोघांनीही १९५ डावांमध्ये हा पल्ला गाठला.
 • कर्णधार म्हणून एका डावात सर्वाधिक धावा काढण्याचा भारतीय विक्रम सचिनच्या नावावर आहे : २१७ धावा (न्यू झीलंडविरुद्ध १९९९-२०००).
 • कसोटी दर्जा प्राप्त असलेल्या सर्व संघांविरुद्ध शतके काढण्याचा पराक्रम करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला भारतीय तर तिसरा जागतिक फलंदाज आहे. त्याच्याआधी ऑस्ट्रेलियाचा स्टीव वॉ आणि दक्षिण आफ्रिकेचा गॅरी कर्स्टन यांनी असा पराक्रम केला होता. राहुल द्रविडनेही असा विक्रम केलेला आहे.
 • परदेशांमध्ये झालेल्या कसोट्यांमध्ये सर्वाधिक धावा काढणारा जागतिक फलंदाज : ८,७०५ धावा.
 • परदेशांमध्ये झालेल्या कसोट्यांमध्ये सर्वाधिक शतके झळकविणारा जागतिक फलंदाज : २९ शतके.
 • एका कॅलेंडर वर्षात १००० धावा अशी कामगिरी सर्वाधिक वेळा करणारा जागतिक फलंदाज : सहा वेळा. सन १९९७ (१००० धावा), १९९९ (१०८८ धावा), २००१ (१००३ धावा), २००२ (१३९२ धावा), २००८ (१०६३ धावा), २०१० (१५६२ धावा).
 • कसोटी कारकिर्दीत चौथ्या डावांमध्ये मिळून सर्वाधिक धावा काढणारा जागतिक फलंदाज.
 • कसोटी कारकिर्दीत दीडशेचा पल्ला सर्वाधिक वेळा गाठणारा जागतिक फलंदाज. वीस कसोटी डावांमध्ये तेंडुलकरने किमान १५० धावा जमविलेल्या आहेत.
 • भारतीय कसोटी इतिहासात सचिन तेंडुलकर हा सर्वात कमी वयात शतक झळकविणारा फलंदाज आहे. त्याआधी हा विक्रम कपिलदेवच्या नावावर होता.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने (एदिसा)संपादन करा

पदार्पणसंपादन करा

 • सचिनने पदार्पण केले तेव्हा कमी वयात एदिसा पदार्पण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाकिस्तानच्या आकिब जावेद नंतर त्याचा क्रमांक लागत होता. भारताकडून पदार्पण करणारा तो सर्वात लहान खेळाडू होता आणि आजही आहे.

सामनेसंपादन करा

 • सर्वाधिक एदिसा खेळण्याचा विक्रम : आजवर ४६३ सामने.
 • चारशे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय डाव खेळणारा सचिन हा पहिला जागतिक फलंदाज आहे.
 • सर्वाधिक मैदानांवर आंतरराष्ट्रीय एदिसा खेळण्याचा विक्रम : ९० मैदाने.
 • २५ एप्रिल १९९० ते २४ एप्रिल १९९८ या कालावधीत भारतीय संघाने खेळलेल्या सर्व (१८५) एदिसांमध्ये तेंडुलकरही खेळलेला आहे. संघासाठी सलगपणे सर्वाधिक सामने खेळण्याचा हा जागतिक विक्रम आहे. [२]

धावासंपादन करा

 • आंतरराष्ट्रीय एदिसा कारकिर्दीत सर्वाधिक धावा : आजवर १८ हजार ४२६ धावा.
 • आंतरराष्ट्रीय एदिसा कारकिर्दीत सर्वाधिक शतके : आजवर ४९ शतके.
 • आंतरराष्ट्रीय एदिसा कारकिर्दीत सर्वाधिक अर्धशतके : आजवर ९६ शतके.
 • आंतरराष्ट्रीय एदिसा कारकिर्दीत किमान ५० धावांचे सर्वाधिक डाव : आजवर १४५ डाव.
 • आंतरराष्ट्रीय एदिसामध्ये एका डावात द्विशतक काढणारा सचिन तेंडुलकर हा पहिला पुरुष फलंदाज आहे. ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार बेलिंडा क्लार्क हिने १९९७ च्या विश्वचषकात एका डावात नाबाद २२९ धावा काढल्या होत्या.[३]
 • दहा हजार धावांचा (आणि त्यापुढील प्रत्येक धावेचा) पल्ला गाठणारा पहिला जागतिक फलंदाज.
 • चौदा हजार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय धावा (आणि पुढील प्रत्येक धाव) जमविणारा एकमेव जागतिक फलंदाज.

कॅलेंडर वर्षातील विक्रमसंपादन करा

 • एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावांचा जागतिक विक्रम : सन १९९८ मध्ये १,८९४ धावा.
 • एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके : सन १९९८ मध्ये नऊ शतके.

भागिदारीतील विक्रमसंपादन करा

 • सलामीच्या जोडीने कारकिर्दीत सर्वाधिक धावा जमविण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर व सौरव गांगुली यांच्या नावावर आहे. एकशे छत्तीस एदिसांमध्ये सलामी देताना २३ अर्धशतकीय आणि २१ शतकीय सलाम्यांसोबत ६,६०९ धावा त्यांनी जमविलेल्या आहेत.
 • आंतरराष्ट्रीय एदिसामधील एका डावातील सर्वाधिक धावांची भागीदारी ३३१ धावांची आहे. या विक्रमाचे मानकरी आहेत : सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड (न्यू झीलंडविरुद्ध १९९९ मध्ये हैदराबाद इथे.)
 • एका विश्वचषकात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम : २००३ च्या विश्वचषकात ६७३ धावा.

संदर्भसंपादन करा

 1. ^ जागत्या स्वप्नाचा प्रवास बोबडे, डॉ. आनंद. जागत्या स्वप्नाचा प्रवास. p. ६.}.
 2. ^ [Cricinfo]
 3. ^ जागत्या स्वप्नाचा प्रवास बोबडे, डॉ. आनंद. जागत्या स्वप्नाचा प्रवास. p. ३३६.}.