संत तुकाराम (चित्रपट)

संत तुकाराम यांच्या जीवनावर आधारीत मराठी चित्रपट.

संत तुकाराम हा संत तुकाराम यांच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट आहे. संत तुकाराम हे महाराष्ट्रातील थोर संत होते. या चित्रपटाची निर्मिती इ.स. १९३६ मध्ये प्रभात फिल्म कंपनीच्या बॅनरखाली विष्णूपंत दामले आणि फत्तेलाल शेख यांनी केली. डिसेंबर १२, इ.स. १९३६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अभूतपूर्व यश संपादित केले. या चित्रपटाचे प्रदर्शन सर्वप्रथम मुंबईच्या सेंट्रल सिनेमा येथे करण्यात आले. या चित्रपटात संत तुकाराम यांची भुमिका विष्णूपंत पागनीस यांनी साकारली. हा चित्रपट भारतात एकाच चित्रपटगृहात वर्षभर सुरू होता. हा त्या वेळचा एक उच्चांक होता. ५ व्या व्हेनिस चित्रपट उत्सवामध्ये या चित्रपटाला पारितोषिक प्रदान करण्यात आले. यानंतर संत तुकाराम यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांची निर्मिती भारतातील अनेक भाषांमध्ये करण्यात आली.

Sant Tukaram