संगीत स्वयंवर (नाटक)

सं. स्वयंवर हे नाटकाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले मराठी नाटक आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १० डिसेंबर, १९१६ रोजी मुंबई येथे झाला. या प्रयोगात रुक्मिणीची भूमिका बालगंधर्वांनी केली होती, तर गणपतराव बोडस कृष्णाच्यारघुवीर सावरकर हे महाराणीच्या भूमिकेत होते. या नाटकासाठी भरजरी शालू, सोन्याचे दागिने तसेच पॅरिसहून मागवलेले अत्तर वापरण्यात आले होते. या नाटकात २५हून अधिक गीते होती.