सँड्रा बुलक (इंग्लिश: Sandra Bullock; २६ जुलै १९६४) ही एक अमेरिकन सिने अभिनेत्री आहे. १९८७ सालापासून हॉलिवूडमध्ये कार्यरत असणारी बुलक हॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन असलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहे. १९९४ सालच्या स्पीड ह्या लोकप्रिय चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बुलक प्रकाशझोतात आली. २००९ सालच्या द ब्लाइंड साईड ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला ऑस्करगोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले.

सँड्रा बुलक
स्थानिक नाव Sandra Bullock
जन्म सँड्रा ॲनेट बुलक
२६ जुलै, १९६४ (1964-07-26) (वय: ५९)
आर्लिंग्टन, व्हर्जिनिया
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ १९८७ - चालू
पती जेसी जेम्स (२००५-१०)

२०१५ साली पीपल्स ह्या नियतकालिकाने बुलक हिला जगातील सर्वात सुंदर स्त्री असा किताब दिला.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: