श्रुतकर्मा हा इंद्रप्रस्थाचा महापराक्रमी अर्जुन व राणी द्रौपदी यांचा पुत्र होता. हा उपपांडवांपैकी सगळ्यात लहान होता.[][]

श्रुतकर्मा आपल्या वडिलांप्रमाणे धनुर्विद्येत पारंगत होता.

कुरुक्षेत्राच्या युद्धात श्रुतकर्माने पहिल्याच दिवशी कंबोजराज सुदक्षिणचा पराभव केला आणि सहाव्या दिवशी जयत्सेनाला हरविले.[] त्याने अश्वत्थामा आणि दुःशासनाशी धनुर्युद्धात झुंज घेतली. १६व्या दिवशी श्रुतकर्माने अभिसारचा राजा चित्रसेनास मारले.


युद्धाच्या शेवटच्या रात्री दुर्योधनाच्या मृत्यूनंतर अश्वत्थामाने कृतवर्मा आणि कृपाचार्य यांच्यासह पांडवांवर निर्वाणीचा हल्ला चढवला. अंधारात झालेल्या या लढाईत आपल्या चार सावत्र भावांसह श्रुतकर्मा मृत्यू पावला.

  1. ^ John Dececco, Devdutt Pattanaik (2014). The Man Who Was a Woman and Other Queer Tales from Hindu Lore. Routledge. ISBN 9781317766308.
  2. ^ The Mahabharata of Krishna-Dwaipayana Vyasa. 2012. ISBN 9781451018264.
  3. ^ "The Fifth and Sixth Days of the Great Battle [Chapter 6]". 9 January 2015.