श्री मल्लिकार्जुन मंदिर (सोलापूर)

प्रस्तावना

संपादन

प्राचीन काळामध्ये सोलापूरचे भाविक येथील किल्ल्यामधील उदध्वस्त देवस्थानाचे दर्शन घेत असत. परंतु १९१७ साली लोकांना त्या मंदिरात जाण्यास इंग्रजांनी बंदी घातल्यामुळे किल्ल्यातील शिवलिंग येथे हलविण्यात आले

इतिहास

संपादन

इ.स. १९१७ मध्ये इंग्रजांच्या काळात सोलापूरच्या भूईकोट किल्यात टोकापर्यंत काही इमारती बुडालेल्या असाव्यात याची शंका तत्कालीन कलेक्टरना आल्याने त्यांना पाहणी केली तेव्हा मंदिराचे काही बुजलेले स्तभ दिसले. म्हणून इ.स.१९१९ मध्ये लार्ड ज गव्हर्नर यांच्या परवानगीने उत्खनन करून शोध घेतला तेव्हा उद्धवस्त अवस्थेत चालुक्य काळातील हिंदू शिवालय व गर्भगृह सापडले. एका शिवसेवकांला मूर्ती व शिवलिंग सापडले. हेच शिवलिंग घेऊन बाळीवेस येथे मंदिर बांधण्यात आले.

हे मंदिर पूर्ण दगडी बांधकामचे आहे व भिंतीच्या खालच्या बाजूस नक्षी कामाची पट्टी आहे पुर्वभिमुख असलेल्या या मंदिराचे दगडी स्तंभ अत्यंत कोरीव आहेत. मंदिराचे गाभाऱ्यात छतावर सभामंडपवर फुलांची नक्षी आहे. या मंदिरात एकूण ३२ स्तंभ आहेत. दोन्हीं बाजूस बसण्यासाठी कक्षासाने् आहेत. स्टँभ ताळखडा चौरस्कृती असून तो अत्यंत सुंदर कलाकृती आहे

उत्सव

संपादन

महाशिवरात्रीला सर्व स्त्रीया दिवे लावून साजरे करतात. तसेच अक्षता वेळी या मंदिरात विशेष उत्सव होतात.

विशेष

संपादन

कलाकुसर,नक्षीकाम, स्थापत्य कौशल्य या सर्वच्या एक उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर सोलापूरच्या जनतेची एक धार्मिक ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. मल्लिकार्जुन देवस्थान हे श्रीशैल मल्लिकार्जुनचे एक रूप आहे.