श्री.सौ. गंगामाई विद्यामंदिर

श्रीमंत सौभाग्यवती गंगामाई विद्यामंदिर ही इचलकरंजी शहरातील सर्वांत जुन्या प्राथमिक शाळांपैकी एक आहे. इचलकरंजीचे जहागीरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांच्या पत्नी सौ. गंगामाई यांच्या स्मरणार्थ शाळेला त्यांचे नाव देण्यात आले.

गंगामाई विद्यामंदिर, इचलकरंजी

स्थापना संपादन

गंगामाई महिलालयाच्या संस्थापिका श्रीमंत सकलसौभाग्यवती गंगामाई नारायणराव घोरपडे संपादन

इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांच्या पत्नी सौ. गंगामाई या अहमदनगरचे सुप्रसिद्ध वकील मोहिनीराज मोरेश्वर परांजपे यांच्या कन्या होत. त्यांचा जन्म ६ जानेवारी १८६५ रोजी नेवासे येथे झाला. विवाह २८ मार्च १८७६ रोजी श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांच्याशी झाला. नारायणराव शिक्षणप्रेमी असल्यामुळे त्यांनी गंगामाईना इंग्रजी शिकवण्यासाठी इंग्रज मडमेची व्यवस्था केली होती. त्या इंग्रजी भाषेत संभाषण आणि पत्रलेखन करत असत. स्त्रियांचा दुपारचा वेळ केवळ गप्पा मारण्यात जाऊ नये आणि एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण व्हावी, सर्वांची प्रगती व्हावी या हेतूने त्यांनी ३ मार्च १९२७ रोजी श्री.स.सौ.गंगामाई महिलालय या संस्थेची स्थापना केली.संस्थेसाठी एक भव्य वस्तू बांधून घेतली. महिलांना पाकशास्त्र, शिवणकला, भरतकाम, विणकाम या कलांचे प्रशिक्षण देणारे वर्ग सुरू केले. अनेक प्रकारच्या स्पर्धाही घेतल्या जात. स्वतः गंगामाई या कार्यक्रमांना उपस्थित राहत असत. इचलकरंजीमध्ये त्यांनी अनेक सुधारणा केल्या. प्रसूतीगृहाची सोय केली. स्वतःकडील ग्रंथसंपत्ती पुणे विद्यापीठास भेट म्हणून दिली. तेथेच एम.ए. इतिहास या विषयासाठी शिष्यवृत्ती ठेवली. त्यांचा मृत्यू इचलकरंजी येथे २३-१२-१९५७ रोजी झाला.

गंगामाई महिलालयाची वाटचाल संपादन

संस्थेच्या वतीने अनेक वर्षे वाचनालय, शिवणक्लास, भजनवर्ग, पाळणाघर असे उपक्रम चालवले गेले. संस्थेत अनेक वर्षांपासून महिलांसाठी सुरू असलेले 'टेबल टेनिस' आणि 'बॅडमिंटन कोर्ट' हे सुद्धा एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.पुढे या संस्थेने गंगामाई विद्यामंदिरची स्थापना ५ जून १९६२ रोजी केली.

गंगामाई महिलालय या संस्थेच्या अध्यक्षा संपादन

सध्या अर्चना दातार(२०१५ पासून) संस्थेच्या अध्यक्षा म्हणून काम पाहतात. यापूर्वीच्या अध्यक्षा आणि त्यांचा कार्यकाल असा आहे:

  • सुधाताई मराठे (१९८५-१९८८)
  • शशिकलाबाई मराठे(१९८८-१९९१)
  • निर्मलाताई बानावली (१९९१-१९९४)
  • आशाताई सौन्दत्तीकर(१९९४-१९९७)
  • सुवर्णा शहा(१९९७-२०००)
  • वंदना केळकर(२०००-२००३)
  • सुषमा दातार(२०१३-२०१५)

वर्ग आणि विद्यार्थी संख्या संपादन

ही शाळा मुला-मुलींची एकत्र असून बालवाडीपासून ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग आहेत. शाळेचे माध्यम मराठी आहे. सध्या शाळेत सुमारे १२५० विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.

मुख्याध्यापिका संपादन

इ.स. २०१४ पासून संध्या धोंडीराम सोनवणे या श्री.सौ.गंगामाई विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका आहेत.

यापूर्वीच्या माजी मुख्याध्यापिका आणि त्यांचा कार्यकाल असा आहे:

  1. उज्ज्वला सखदेव जोशी (१९६२-६३)(१९६७-६९)
  2. मंगला हरी दामले (१९६३-६७)(१९७०-७६)(१९७९-९१)
  3. सुलोचना शिंदे (१९६९-७०)
  4. मालती भेडसगावकर (१९७६-७९)(१९९१-२०००)
  5. शांता कुलकर्णी (२०००-२००१)
  6. विदुला नातू(२००२-२००४)
  7. सुनंदा डोंगरे(२००५-११)
  8. सुरेखा हनगंडी(२०११-१२)
  9. सुवर्णा माने(२०१२-१४)

व्यवस्थापन संपादन

सोयीसुविधा संपादन

उपक्रम संपादन

उल्लेखनीय माजी विद्यार्थी संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

संदर्भ :

  1. साचा:सुवर्ण दीप-स्मरणिका, गंगामाई विद्यामंदिर सुवर्ण महोत्सवी वर्ष
  2. साचा:अमृत गंगा स्मरणिका, गंगामाई महिलालय अमृत महोत्सवी वर्ष