श्रीलंका क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२२
श्रीलंका क्रिकेट संघाने मे २०२२ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळवली गेली. मार्च २०२२ मध्ये बीसीबीने दौऱ्याची पुष्टी केली.
श्रीलंका क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२२ | |||||
बांगलादेश | श्रीलंका | ||||
तारीख | १५ – २७ मे २०२२ | ||||
संघनायक | मोमिनुल हक | दिमुथ करुणारत्ने | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | श्रीलंका संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मुशफिकुर रहिम (३०३) | अँजेलो मॅथ्यूस (३४४) | |||
सर्वाधिक बळी | शाकिब अल हसन (९) | असिथा फर्नांडो (१३) | |||
मालिकावीर | अँजेलो मॅथ्यूस (श्रीलंका) |
पहिल्या कसोटी अनिर्णित सुटली. दुसऱ्या कसोटीमध्ये शेवटच्या दिवशी श्रीलंकन गोलंदाज असिथा फर्नांडो याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने दुसऱ्या डावात बांगलादेशला कमी आघाडीमध्ये बाद केले व २९ धावांचे लक्ष्य सहजरित्या पार पाडले.
सराव सामने
संपादनदोन-दिवसीय सामना:बांगलादेश क्रिकेट बोर्ड XI वि श्रीलंका
संपादन
२०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- दुखापतग्रस्त असलेल्या विश्वा फर्नांडोची कसुन रजिताने कसोटीमध्ये श्रीलंकेकडून पुर्णवेळ बदली खेळाडू म्हणून जागा घेतली.
- उष्माघातामुळे इंग्लंडचे पंच रिचर्ड केटलबोरो यांची जागा वेस्ट इंडीजचे पंच जोएल विल्सन यांनी चौथ्या दिवशी घेतली.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : बांगलादेश - ४, श्रीलंका - ४.
२री कसोटी
संपादन
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत