श्रीलंका क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१९-२०
श्रीलंका क्रिकेट संघाने जानेवारी २०२० मध्ये २ कसोटी सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअंतर्गत खेळवली गेली नाही कारण झिम्बाब्वे या स्पर्धेतला भाग नाही.
श्रीलंका क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१९-२० | |||||
झिम्बाब्वे | श्रीलंका | ||||
तारीख | १९ – ३१ जानेवारी २०२० | ||||
संघनायक | शॉन विल्यम्स | दिमुथ करुणारत्ने | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | श्रीलंका संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शॉन विल्यम्स (२१७) | अँजेलो डेव्हिस मॅथ्यूस (२७७) | |||
सर्वाधिक बळी | सिकंदर रझा (११) | लसिथ एम्बलडेनिया (१३) | |||
मालिकावीर | अँजेलो डेव्हिस मॅथ्यूस (श्रीलंका) |
ऑक्टोबर २०१९ मध्ये झिम्बाब्वेवरील बंदी हटविल्यानंतरची प्रथमच कसोटी मालिका होती.
कसोटी मालिका
संपादन१ली कसोटी
संपादन१९-२३ जानेवारी २०२०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: झिम्बाब्वे, फलंदाजी
- केविन कसुझा, ॲनस्ले लोवु आणि विक्टर नयुची (झि) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले. तर केविन कसुझाला दुखापत झाल्यामुळे ब्रायन मुडझिनगनयामाने बदली खेळाडू म्हणून कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
संपादन२७-३१ जानेवारी २०२०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: झिम्बाब्वे, फलंदाजी.
- टिनोटेंडा मुटोंबोडझी (झि) याने कसोटी पदार्पण केले.