श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८७-८८

श्रीलंका क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९८८ दरम्यान एक कसोटी सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. श्रीलंकेने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामना खेळला. एकमेव कसोटी सामन्याव्यतिरिक्त श्रीलंकेने ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडसोबत एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला. रंजन मदुगलेने एकमेव कसोटी सामना आणि तिरंगी मालिकेत श्रीलंकेचे नेतृत्व केले.

श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८७-८८
ऑस्ट्रेलिया
श्रीलंका
तारीख १२ – १५ फेब्रुवारी १९८८
संघनायक ॲलन बॉर्डर रंजन मदुगले
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली

तिरंगी मालिकेत श्रीलंकेने निराशाजनक कामगिरी गेली. गट फेरीच्या ८ सामन्यांपैकी श्रीलंकेला फक्त एका सामन्यात विजय मिळवता आला. वाका मैदानावर खेळवला गेलेला एकमेव कसोटी सामना यजमान ऑस्ट्रेलियाने १ डाव आणि १०८ धावांनी जिंकला.


कसोटी मालिका

संपादन

एकमेव कसोटी

संपादन
१२-१५ फेब्रुवारी १९८८
धावफलक
वि
४५५ (१३७.२ षटके)
डीन जोन्स १०२ (१७४)
रवि रत्नायके ४/९८ (४० षटके)
१९४ (८२.३ षटके)
अर्जुन रणतुंगा ५५ (१६९)
स्टीव वॉ ४/३३ (२० षटके)
१५३ (५२.१ षटके)(फॉ/ऑ)
अर्जुन रणतुंगा ४५ (६५)
मर्व्ह ह्युस ५/६७ (२१ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १०८ धावांनी विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: डीन जोन्स (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • ऑस्ट्रेलियन भूमीवरचा श्रीलंकेचा पहिला कसोटी सामना.
  • चंपक रमानायके (श्री) याने कसोटी पदार्पण केले.