श्रीराम रावसाहेब गुंदेकर (१२ ऑक्टोंबर १९५५ – १२ जानेवारी २०१८) हे मराठीतले एक ग्रामीण साहित्यिक, समीक्षक, सत्यशोधकी साहित्याचे अभ्यासक, संशोधक व भाष्यकार होते.[ संदर्भ हवा ] १९७५ साली ते युक्रांद चळवळीचा एक हिस्सा होते. डॉ. श्रीराम गुंदेकर हे पहिल्या पिढीतील ग्रामीण कथाकार, समीक्षक म्हणून ओळखले जातात.[ संदर्भ हवा ] त्यांनी 'सत्यशोधकी साहित्याचा इतिहास' लेखनाचा चार खंडांचा बृहद लेखनप्रकल्प सुरू केला आणि तो पूर्णत्वास नेला. 'सत्यशोधकी साहित्याचा इतिहास: खंड ३, (१९५१ - १९९०)' लिहून पूर्ण असला तरी अप्रकाशित आहे. 'सत्यशोधकी साहित्याचा इतिहास: खंड ४' हा हस्तलिखित स्वरूपात आहे.[ संदर्भ हवा ]

श्रीराम गुंदेकर
जन्म नाव श्रीराम रावसाहेब गुंदेकर
जन्म ऑक्टोबर १२, इ.स. १९५५
आंबेसावळी, बीड जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू जानेवारी १२, इ.स. २०१८
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र प्राध्यापक
साहित्य प्रकार कथा, समीक्षा
विषय सामाजिक, वैचारिक
चळवळ सत्यशोधक चळवळ
प्रसिद्ध साहित्यकृती उचल
लगाम
पत्नी संजीवनी गुंदेकर
अपत्ये सारिका गुंदेकर

प्रकाशित साहित्य संपादन

कथासंग्रह संपादन

  • उचल (१९९०)
  • लगाम (१९९९)

वैचारिक लेखन संपादन

  • ग्रामीण साहित्यः प्रेरणा आणि प्रयोजन (१९९९)
  • महात्मा जोतिबा फुले: विचार आणि वाङ्मय - भाग: १ आणि २ (१९९२)
  • सत्यशोधकी साहित्यः परंपरा आणि स्वरूप (२००३)
  • महाराष्ट्राचे शिल्पकार सम्यक क्रांतीचे प्रणेते सत्यशोधक म. जोतिबा फुले (२००४)
  • महात्मा फुले यांची अखंडरचना: म. फुले स्मृतिव्याख्यानमाला (२००५)
  • म. जोतिबा फुले: साहित्य आणि साहित्यमूल्ये (२००२)
  • रा.ना. चव्हाण यांचे विचारविश्व (२०१४)
  • ‘सत्यशोधकी साहित्याचा इतिहास: खंड १ (प्रारंभ ते १९२०) (२०१०)
  • सत्यशोधकी साहित्याचा इतिहास: खंड २, भाग १ व २ (इ.स. १९२१ -१९५०)’ (२०१३)

बालकविता संग्रह संपादन

  • ढगाची तहान (१९९९)
  • श्रेष्ठ कोण माणूस की मांजर (१९९९)

साहित्य पुरस्कार आणि गौरव पत्र संपादन

  1. भि.ग. रोहमाने पुरस्कार, कोपरगाव, जि. अहमदनगर; 'उचल' या कथासंग्रहासाठी - १९९०
  2. नरहर कुरूंदकर पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद - 'महात्मा ज्योतीबा फुले विचार आणि वाङ्मय' - १९९२
  3. महाराष्ट्र शासन, उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार, - 'महात्मा ज्योतीबा फुले विचार आणि वाङ्मय'- १९९३-९४
  4. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले साहित्य पुरस्कार, अहमदपूर, जि. लातूर- सर्व साहित्य लेखनासाठी - १९९५
  5. परिवर्तन सांस्कृतिक बहुउद्देशीय मंच, यवतमाळ - सर्व साहित्य लेखनासाठी - १९९७
  6. सुशील प्रधान बालसाहित्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. 'ढगाची तहान' या बालकविता संग्रहास - १९९९
  7. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार, - 'ग्रामीण साहित्य प्रेरणा व प्रयोजन' - १९९९-२०००
  8. सुदाम सावरकर जनसारस्वत साहित्य पुरस्कार, मराठी जनसाहित्य परिषद, अमरावती. - 'महात्मा ज्योतीबा फुले : साहित्य आणि साहित्य; मूल्ये' - २००२
  9. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार, - 'महात्मा ज्योतीबा फुले : साहित्य आणि साहित्य; मूल्ये' - २००२-२००३
  10. दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारकसमिती तरवडी, जि. अहमदनगर. - 'महात्मा ज्योतीबा फुले: साहित्य आणि साहित्य
  11. सेवाभूमी साहित्य पुरस्कार, लातूर - सर्व साहित्य लेखनासाठी - २००३
  12. डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषद, लातूर - साहित्य लेखनासाठी गौरवपत्र - २०१२
  13. श्रीराम गुंदेकर हे अखिल भारतीय सत्यशोधकी साहित्य संशोधन परिषदेचे काही काळ अध्यक्ष होते.

हे सुद्धा पहा संपादन

सत्यशोधकी साहित्य संमेलन ओबीसी साहित्य संमेलन विद्रोही साहित्य संमेलन मराठी साहित्य संमेलने

इतर ग्रंथ संपादन

डॉ.श्रीराम गुंदेकर :व्यक्ती आणि वाङ्मय-संपादक डॉ.नरसिंग कदम ,सहसंपादक प्रा. संजीवकुमार माने ( उदगीर )