संतमंगलम रंगा आयंगार श्रीनिवास वरदन (जानेवारी २, १९४०:मद्रास-हयात) हे भारतीय गणितज्ञ आहेत. ते सध्या कुरंट गणितीय विज्ञान संस्था, न्यू यॉर्क विद्यापीठ येथे गणिताचे प्राध्यापक आहेत. त्यांना मार्च २२, इ.स. २००७ या दिवशी गणितातील नोबेल पारितोषिक समजले जाणारे अबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले.

वरधन यानी बी.एस.सी. आणि एम.ए. मद्रास विद्यापीठातून केले. इ.स. १९६३ मध्ये भारतीय सांख्यिकी संस्था, कोलकाता येथून पी.एच.डी. पदवी मिळवली. त्यानंतर पुढील संशोधनासाठी ते कुरंट गणितीय विज्ञान संस्था, न्यू यॉर्क विद्यापीठ येथे गेले.

बाह्य दुवे

संपादन

अबेल पारितोषिकाची घोषणा