श्रम

निःसंदिग्धीकरण पाने

प्रस्तावना-परिचयसंपादन करा

श्रम म्हणजे कुठलं तरी ध्येय प्राप्त करण्यासाठी व्यक्ती जे शारीरिक, बौद्धिक कष्ट किंवा मेहनत घेणे. त्याला एका अर्थाने काम किंवा कार्य पण म्हणतात.

श्रम करण्यामागे कुठलं तरी ध्येय (goal) मिळवण्याचा विचार असतो.जर मोबदल्याची अपेक्षा असेल त्या कार्याला पण श्रम म्हणू शकतो. जर कुठल्याच मोबदल्याची अपेक्षा नसेल तर ते कार्य श्रम म्हणाले जाऊ शकत नाही.[१]

श्रमाचे प्रकारसंपादन करा

व्यक्ती जे श्रम करते त्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारां मध्ये विभागलं जाऊ शकतं.

शारीरिक श्रमसंपादन करा

उदाहराणार्थ, बांधकाम करणारा माणूस जे विटा उचलणे, सिमेंट लावणे/ मिसळणे वगेरे काम करतो त्याला आपण शारीरिक श्रम म्हणू शकतो. ती व्यक्ती ह्या कार्यात बुद्धीचा पण वापर करते पण मुख्यतः ती व्यक्ती आपल्या शरीराला कष्ट देत असतो/ असते.

बौद्धिक श्रमसंपादन करा

शिक्षक जे शिकवण्याचं किंवा विद्यार्थी जे शिकण्याचं काम करतात त्याला आपण बौद्धिक श्रम म्हणू शकतो कारण ते दोघेही आपल्या बुद्धीला कष्ट देत असतात. कसला तरी विचार करणे ह्याला पण आपण श्रम म्हणू शकतो कारण त्यात व्यक्तीची बौद्धिक क्षमता वापरली जात असते.

रोजगारीसंपादन करा

जेव्हा श्रम करण्यासाठी आर्थिक मोबदला मिळत असतो त्या श्रमाला रोजगारी म्हणतात.

सर्जनात्मक श्रमसंपादन करा

सर्जनात्मक किंवा रचानात्मक ध्येय मिळवण्यासाठी घेणात आलेल्या श्रमाला सर्जनात्मक श्रम म्हणतात. कागदाचा उपयोग करून ओरिगामी कलेचा वापर करणे, काहीतरी नवीन लिहिणे, भाषांतर करणे ह्याला आपण सर्जनात्मक श्रम म्हणू शकतो.

श्रमाचे कौशल्य आधारित प्रकारसंपादन करा

श्रमाचे कुशल, अर्धकुशल आणि अकुशल असे कौशल्यावर आधारित प्रकार आपण करू शकतो. शिक्षकाचे, चित्रकाराचे आणि लेखकाच्या कार्याला कुशल श्रम म्हणलं जाऊ शकतं. गवंडी जे खडे फोडण्याचे काम करतो त्याला अकुशल कार्य म्हणतात. सुतार, चांभार ह्याचे श्रम अर्धकुशल श्रमात मोडतात.व्यक्तीला ज्यात्या कौशल्यानुसार वेतन किंवा मोबदला मिळतो. जेव्हा वेतन विभागाणीचा अभ्यास केला जातो तेव्हा पण हे प्रकार लक्षात घेतले जातात. [२]

शोषणसंपादन करा

जेव्हा व्यक्तीला त्याचा श्रामाच्याआ योग्य प्रमाणात मोबदला मिळत नाही तेव्हा त्या व्यक्तीचे शोषण होत आहे असे आपण म्हणू शकतो. स्त्रिया त्यांचे घरकाम हे त्या प्रेमापोटी करत आहेत असा समाज आहे त्यामुळे स्त्रीयांना त्यांच्या श्रमाचा मोबदला दिला जात नाही. ह्याला पण आपण शोषण म्हणू शकतो.

श्रमिक चळवळीसंपादन करा

कार्ल मार्क्सच्या म्हणण्या प्रमाणे शोषक आंनी शोषित हेन्च्यातील असमानता वाढली आणि श्रमिकांचे शोषण वाढले तर श्रामीन चळवळ चालू करतात. ही चळवळ हक्क पार मिळवायला असू शकते. श्रमिक चळवळी चालवण्यासाठी श्रमिक संगठना असतात.

स्त्रियांचे श्रमसंपादन करा

स्त्रिया जे घरात कार्य करतात त्याला श्रम धरण्यात येत नाही कारण ते कार्य कुठल्याही मोबदल्याच्या अपेक्षेसह करण्यात येत नाही. या कार्यात स्वयंपाक करणे, परिवाराच्या ज्येष्ठ लोकांच्या श्रमाला अनुत्पादक श्रम म्हणले जाते. पण हे घरात करण्यात येणारे कार्य पण उत्पादक आहे. ह्या घरच्या श्रमासाठी (घरकामासाठी) कुठल्या तरी प्रकारचा मोबदला मिळावा ह्याच्यासाठी नारीवादी संगठना कार्यरत आहेत.

श्रम विभागणीसंपादन करा

कार्ल मार्क्स [1]नावाच्या जर्मन विद्वानाने श्रमाच्या संकल्पनेवर खूप महत्त्वाचे योगदान केले आहे. मार्क्सने श्रमविभागणी बद्दल कार्य केले. श्रमविभागणी ही परापूर्वे पासून अस्तित्वात आहे. प्रागैतिहासिक काळात सुध्धा आदिमानावांमध्ये पण श्रमाची विभागणी झालेली होती. त्या काळात शिकार करणारा वर्ग आणि भाजीपाला गोळा करणारा वर्ग अशी श्रमाची विभागणी करण्यात आलेली होती. मार्क्सच्या काळात श्रम करणारा वर्ग आणि श्रम करवून घेणारा वर्ग अशी विभागणी होती. जर श्रेक आणि श्रम करवून घेण्यार्या व्यक्ति मधील असमानतेची दरी जास्त वाढली तर ती वर्ग संघर्षाचे कारण ठरू शकते. हा वर्ग संघर्ष क्रांती कडे नेऊ शकतो.

स्वाश्रयसंपादन करा

मोहनदास करमचंद गांधी [1] ह्यांनी श्रमाचे महत्त्व स्वाश्रय ह्या अर्थानी केले आहे. त्यांच्या मते सर्वान्नी आपले कार्य आपले आपणच करायला पाहिजे. तसे केल्याने शोषण होऊ शकत नाही आणि कार्याचे अपेक्षित परिणाम मिळू शकते. स्वाश्रयाच्या सिद्धांता वरून त्यांनी स्वदेशीचा विचार दिला. जर प्रत्येक भारतीय व्यक्ति स्वश्रमाने आपापले उत्पादन करेल तर विदेशी आयात थांबेल आणि अश्या रीतीने देशाला स्वावलंबन आणि स्वतंत्रता लाभेल.

श्रमाचे महत्त्वसंपादन करा

श्रमाचे महत्त्व बऱ्याच भारतीय ग्रंथांमध्ये केले गेलेले आहे. शारीरिक श्रम करण्याने व्यक्तीला शरीरसौष्ठव लाभू शकते. रोजचे काम हे शारीरिक श्रम आहे. मजूर जे काम करतात ते शारीरिक श्रम आहे आणि त्यांना जास्तीच्या श्रमाची गरज नाही. कारण ते जे मूळ काम करतात त्याच्यानी त्यांना जरूरीपेक्षा जास्त व्यायाम मिळतो जो बऱ्याचवेळा घातक पण ठरतो. पण बौध्धिक श्रम करण्यार्या लोकांनी लठ्ठपणा, रक्तदाब, मधुमेह ,हृदयरोग ,वगेरेनी स्वता:ला वाचवायला शारीरिक श्रम केले पाहिजे. परंतु शारीरिक श्रम पण योग्य प्रमाणात होणे आवश्यक आहे नाहीतर दुसरे विकार होऊ शकतात.

संदर्भसंपादन करा

{{संदर्भयादी}

  1. ^ https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand18/index.php/component/content/article?id=10448
  2. ^ https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand18/index.php/component/content/article?id=10448