शेततळी उपाय कि नवी समस्या
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
गावतळी आणि विहिरी यांचा मुख्य आधार भूजल आहे. स्वातंत्र्योत्तर काळात मुख्यता हरित क्रांती पूर्वी विहिरी आणि गावतळी हेच बागायती शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत आहे.परंतु हरितक्रांती आणि विजेचे सर्वत्रीकरण यामुळे भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आणि लवकरच भूजल पातळीत मोठ्या प्रमाणावर घट झाली. दुष्काळ पडला आणि पाण्याचा तुटवडा जाणवू लागला. त्याच काळात बोअरवेलचे तंत्रज्ञान पाण्याच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी अस्तित्वात आले. बोअरवेल्सच्या पाण्याचा भरमसाठ उपसा केला आणि परिणामी भूजलाची पातळी खूप खोल गेली.त्यामुळे जेव्हा अगदी खोलवर उभे व आडवे बोअरवेल घेऊनही पाणी मिळणे दुर्लभ झाले. पावसाळ्यात शेतातून वाहून जाणारे पाणी शेततळ्यातच अडवायचे व हेच पाणी टंचाईच्या काळात पिकांसाठी वापरायचे हे यामागील मुख्य हेतू होता, तर शेततळ्याचे पाणी भूजलाची पातळी उंचवण्यास साह्यभूत ठरेल. परंतु शेततळ्यांची संख्या आणि त्यात पाणी साठवण्यासाठी होणारा भूजलाचा अनिर्बंध वापर व उपसा यामुळे शेततळी भूजलाच्या पातळीत आणखी घट होण्यास कारणीभूत ठरत आहे.
शेततळ्यांची सद्यस्थिती
संपादनशेततळ्याच्या पाण्याचा योग्य वापर आणि त्यामुळे शेतीला मिळणारे भरघोस उत्पन्न मिळते.त्यामुळे शेततळ्याची परिणामकारकता बघून शेततळ्याचे धोरण राबवाण्यासाठी व शेतकऱ्यांना अनुदान आणि प्रोत्साहान देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक सरकारी योजना आणल्या. प्रत्यक्षात पावसाचे वाहून जाणारे पाणी साठवणारे शेततळे दिसत नाही. जवळ जवळ सर्वच शेतकरी विहिरी आणि बोअरवेलच्या माध्यमातून जमिनीतील भूजलाचा उपसा करून शेततळ्यात पाणी साठवतात. परिणामी भूजलाची पटली आणखी खोल जाण्यास ते कारणीभूत ठरतात. अस्तित्वात असलेल्या शेततळ्यात परतावीत रचनेनुसार पावसाचे पाणी आत येण्यासाठी गरजेचे असलेले ‘इनलेट’ आणि ओव्हरफ्लो वाहून जाण्यासाठी ‘आऊटलेट’ दिसून येत नाही. तसेच शेततळ्याच्या नियमनाचा आणि नियोजनाचा अभाव दिसतो. तसेच शेततळ्याची संख्या किती असावी आणि त्यांचे आकारमान किती असावे यावर सरकारी विभागाचे आणि अधिकाऱ्यांचे कोणतेही नियमन दिसून येत नाही.
शेततळ्याच्या पाण्याचे बाष्पीभवन : काळजीचा मुदा
संपादनउन्हाळ्यात सरासरी तापमान ४० अंशापर्यंत जाते त्यामुळे बश्बिभावानाचा वेग त्या भागात वाढतो. महाराष्ट्रात वर्षाला एकूण जलसाठ्याच्या ४० ते ४२ %इतक्या पाण्याचे बाष्पीभवन होते. शेततळ्यात साठविल्या जाणाऱ्या पाण्याचे बाष्पीभवन शेततळ्याच्या संख्या, आकारमान, आणि पाणी साठवण्यासाठी होणारा भुजलाचा उपसा यामुळे होते कि नाही हा महत्त्वाचा मुदा आहे.
शेततळ्याच्या वापराचे दुष्परिणाम
संपादनअनेक गावात अशी परिस्थितीत निर्माण झाली आहे कि शेतकऱ्यांच्या शेततळ्यात अगदी उन्हाळ्यात बागायतीसाठी भरपूर पाणी उपलब्ध आहे. पण त्याच वेळी गावात पिण्याच्या पाण्यासाठी सरकारी टँकर बोलवावा लागत आहे. गावाला पुरवठा करणाऱ्या विहिरी आणि बोअरवेल्स लवकरच कोरड्या पडत आहे. परिणामी त्यावर अवलंबून असणारी स्थानिक जैवविविधता व भूजल साठे धोक्यात येत आहे.
शेततळी एक उपयुक्त आणि परिणामकारक साधन आहे. पण ते एक नवी समस्या न बनण्यासाठी शेततळ्यांच्या विविध योजनां मध्ये समन्वय आणि नियमनाची गरज आहे.
संदर्भ
संपादन- पुस्तकाचे नाव – जल नियोजन आणि व्यवस्थापन