शेटे हे भारतातील महाराष्ट्र राज्यात आढळणारे आडनाव आहे.

सोलापूरचे शेटे घराणे

संपादन

सोलापूर शहर हे मंगळवार पेठ,दक्षिण आणि उत्तर कसबा या भागापुरतेच मर्यादित होते. अन्य सबंध परिसर शेतीचा होता. १८५३ सालात सोलापूर नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर या गावठाण परिसराची पुनर्रचना करून त्या परिसराला वेगवेगळ्या पेठेची नावे देण्यात आली आणि सोलापूरचा विस्तार झाला.नगरपालिकेच्या स्थापनेनंतर दक्षिण कसबा लगतचा भाग पुनर्रचनेत शुक्रवार पेठेत गेला. साडे तीनशे वर्षांपासून या भागात नागरिकांचे वास्तव्य आहे. यापैकीच एक जुने घराणे म्हणजे मल्लिकार्जुन शेटे यांचे होय. सोलापूरच्या उभारणीमध्ये ज्या वतनदार आणि जुन्या घराण्यांचे योगदान आहे त्यापैकी एक म्हणजे शुक्रवार पेठेतील शेटे घराणे होय. 900 वर्षांपेक्षाही जुनी असलेली कावडीची परंपरा या घराण्याकडे आहे. सिद्धरामेश्वरांच्या जन्मापासून आंध्र प्रदेशमधील श्रीशैल देवस्थानला सोलापूरहून पायी कावड नेण्याची परंपरा आहे. ही परंपरा देशमुख आणि शेटे घराण्याकडे आहे.

शुक्रवार पेठेतील शेटे यांचा 125 वर्षाहून अधिक जुना वाडा आहे. दगडमातीचे बांधकाम आणि सागवानी लाकडाच्या खांबांवर उभे असलेल्या या वाड्याचे दगडी प्रवेशद्वार आणि कमानीवरून पूर्वीचे वैभव दिसते.आजोबा गणपतीचा (शेटेंचा गणपती) मान आणि ञिपुरांकेश्वर लिंगाच्या भोवतालचे मंदिर शेटे यांनी बांधले व देखभालीची जबाबदारीही त्यांच्याकडेच होती. गेल्या अनेक वर्षापासून सोलापूरात श्री शिवयोगी सिद्धारामेश्वराचा विवाह सोहळा साजरा होतो. या विधीची सुरुवात कै. रामचंद्रप्पा शेटे यांच्या घरात योगदंडाची पूजा करून होते. यानंतर विड्याचा मानदेखील या घराण्याला आहे. ही परंपरा आजही चालू असून शेटे घराण्याचा वारसदार विजयाताई थोबडे यांचे चिरंजीव अडवोकेट मिलिंद थोबडे (शेटे)ही परंपरा चालवितात.