शेकोटी
शेकोटी ही आग पेटवून थंडीपासून बचाव करण्यासाठी वापण्यात येणारी एक व्यवस्था आहे. यात चुलीसारखेच पण लाकडे / कोळसे इत्यादी घराबाहेर पेटविण्यात येतात व त्यासमोर बसल्यावर ऊब मिळते व थंडीपासून बचाव होतो. थंड झालेले हातही यावर शेकतात.हिवाळ्यात तापमान घसरले म्हणजे याचा वापर सर्व लोकं करतात.
ज्वलन
संपादनयात जळण म्हणून काड्या, काडी-कचरा, वाळलेली पाने, रद्दी कागद अथवा काहीही ज्वलनशील पदार्थांचा वापर करण्यात येतो. पण याद्वारे कर्ब-द्वी-प्राणीद (कार्बन डाय ऑक्साईड) हा वायू बऱ्याच प्रमाणात बाहेर पडतोत तो वातावरणास हानीकारक असतो. क्वचित यात जूने टायरही जाळण्यात येतात.
घरघुती वापर
संपादनघरात शेकोटी करण्यास घमेले वापरण्यात येते, ज्याने आगीस मर्यादित प्रमाणात वापरता येते. घरात राख होत नाही. ही योजना फायरप्लेस सारखी असते.
लहान गावात अनेक लोकं शेकोटीभोवती जमल्याने, तेथे राजकारण, प्रकरण, एखादा ज्वलंत विषय यावरील गप्पा रंगतात.
तोटे
संपादन- प्रदूषण होते.
- शरीराची एकच बाजू शेकल्या जाते दुसरी बाजू थंड राहते.
- वादावादीचे प्रसंग उद्भवतात.