शून्याधारित अर्थसंकल्प


१९६० च्या दशकात युएसमध्ये एका खासगी कंपनीने शून्याधारित संकल्पना शोधून काढली , यूएसएच्या अर्थव्यवस्थेत पीटर ए. पीहर यांनी शून्याधारित अर्थसंकल्पाची संकल्पना मांडली .१९७९ मध्ये जॉर्जियाचे गव्हर्नर असताना जिमी कार्टर यांनी सर्वप्रथम सार्वजनिक क्षेत्रात या संकल्पनेचा वापर केला .युएसएचे राष्ट्राध्यक्ष झाल्यावर जिमी कार्टर यांनी ही संकल्पना यूएसएच्या अर्थसंकल्पात वापरली . शून्याधारित अर्थसंकल्पात खर्च करण्याआधी ३ प्रश्न स्वतः लाच विचारले जातात . आपण खर्च केला पाहिजे का ? आपल्याला किती खर्च करावा लागेल ? आपण कुठे खर्च केला पाहिजे ? कोणत्याही विभाग किंवा खात्याद्वारा प्रस्तावित खर्चाचा पुनर्विचार करून प्रत्येक खर्चाला एकदम सुरुवातीपासून म्हणजे शून्य मानून नव्या पद्धतीने मूल्यमापन करणे , याला शून्याधारित अर्थसंकल्प म्हणावे .

साधारणतः पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडतांना गतवर्षाचा संकल्प आधार मानण्यात येतो. मात्र अनेकदा, मागील वर्षीच्या अनावश्यक योजना व खर्च तसाच पुढे चालु ठेवला जातो व त्यामुळे आवश्यक बाबीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता निर्माण होते. सतत वाढत्या खर्चाचे अर्थसंकल्प टाळण्यासाठी शून्याधारित अर्थसंकल्प वापरला जातो.यात सरकारच्या प्रत्येक खात्याला आपले अंदाज ठरवितांना मागील वर्षाचे खर्चाचे आकडे आधारभूत न मानता आपल्या खात्याचा अगदी सुरुवातीपासून किंवा शून्यापासून खर्चाचा अंदाज घेण्यास सांगितले जातात. म्हणजेच आधार शून्य मानण्यात येतो. म्हणून त्याला शून्याधारित अर्थसंकल्प म्हणतात. मात्र यामुळे सामाजिक न्याय व समाजकल्याण याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या राज्यांत याचा प्रयोग करण्यात आला होता, पण तो लोकप्रिय ठरला नाही.

अधिक वाचन संपादन

  • मराठी विश्वकोश : भाग १७

बाह्य दुवे संपादन