शुभ्रकंठी
शुभ्रकंठी, किंवा फिकी मुनिया (शास्त्रीय नाव: Euodice malabarica, यूओडाइस मालाबारिका ; इंग्लिश: White-throated Munia, व्हाईट थ्रोटेड मुनिया) ही भारतीय उपखंडात आढळणारी, चटकाद्य पक्षिकुळातील प्रजाती आहे. खुरटी झुडपे किंवा गवताळ प्रदेशांत यांचा आढळ दिसतो. शुभ्रकंठ्यांमधील नर आकारमानाने साधारणतः १०-१२ सें.मी.पर्यंत वाढतात. यांना चंदेरी रंगाची, शंक्वाकार चोच असते. यांच्या पाठीकडील भाग मातकट ब्राउन रंगाचा असतो, तर पोटाकडील भाग पांढुरके असतात. पंखांचा रंग बहुशः मातकट-ब्राउन असला, तरीही त्यांच्या कडा शेपटीप्रमाणे गडद काळपट रंगाच्या असतात.
शास्त्रीय नाव |
यूओडाइस मालाबारिका (Euodice malabarica) |
---|---|
कुळ | चटकाद्य |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश |
व्हाईट थ्रोटेड मुनिया (White-throated Munia) |
संस्कृत | श्वेतकण्ठ पुत्री |
हिंदी | चडक्का, पिदार |
अधिक वाचन
संपादन- पांडे,सतीश. बर्ड्स ऑफ वेस्टर्न्स घाट्स, कोंकण अँड मलबार (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "शुभ्रकंठ्यांची चित्रे, आवाजांची ध्वनिमुद्रणे व अन्य माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |